पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या नावाने बनावट ट्विटर अकाऊंट, अनेक आयपीएस अधिकाऱ्यांना गंडा

मोक्षदा पाटील यांनी याबाबत सायबर खात्याकडे याबाबत तक्रार केली

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : लोहमार्ग पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या नावाने ट्वीटरवर बनावट खाते उघडण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एवढंच नाहीतर या बनावट खात्यावरून सायबर भामट्याने देशभरातली अनेक आयीपीएस अधिकाऱ्यांकडून पैसे उकळल्याचेही समोर आल्याने खळबळ उडाली आहे. कारण, सायबर भामट्याने चक्क पोलिसांनाच गंडा घातल्याने, सर्वसामान्यांनी काय करावे असा प्रश्न निर्माण होत आहे. A fake Twitter account in the name of Superintendent of Police Mokshada Patil duped many IPS officers

या सायबर भामट्याने आयपीएस मोक्षदा पाटील यांच्या नावाने ट्वीटरव बनावट अकाउंट उघडले होते. त्यानंतर या बनावट खात्यावरून त्याने एका मुलीचे लिव्हर ट्रान्सप्लांट केले असून, तिच्यावर उपचार सुरू असल्याची पोस्ट टाकली आणि सोबतच या मुलीला उपचारासाठी पैशांची नितांत गरज आहे, असा मेसेज केला. याशिवाय उपचार सुरू असलेल्या मुलीस एका महिलेचा फोटो आणि क्यूआर कोड ट्वीट करून व्हायरल केला आहे. हे अकाउंट मोक्षदा पाटील यांचे असल्याचे समजून अनेकांनी त्यावर विश्वास ठेवला व आयपीएस अधिकाऱ्यांसह अनेकांनी पैसे पाठवले.

दरम्यान या प्रकाराची माहिती मिळताच मोक्षदा पाटील यांनी याबाबत सायबर खात्याकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर अनेकांकडून रिपोर्ट गेल्यानंतर २७ मार्चला रात्री ११ वाजता हे खाते बंद करण्यात आले.

A fake Twitter account in the name of Superintendent of Police Mokshada Patil duped many IPS officers

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात