राज ठाकरेंच्या नेतृत्वात मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

जाणून घ्या, या भेटीत नेमक्या काय मागण्या करण्यात आल्या आहेत?

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतली. याप्रसंगी राज्यातील विविध प्रश्न आणि मुद्द्यांवर राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडत, मुख्यमंत्र्यांकडे काही मागण्याही सादर केल्या. सिडको गृहनिर्माण लॉटरी (दिवाळी २०२२) सोडतधारकांचे प्रश्न, मागण्या, अडचणींकडे लक्ष देऊन त्या तत्काळ सोडवाव्यात अशी विनंतीही करण्यात आली. A delegation of MNS led by Raj Thackeray met Chief Minister Eknath Shinde

राज्य शासनाच्या शाळा वगळून राज्यातील इतर परीक्षा मंडळाच्या शाळांमध्ये मराठी या विषयाचे मूल्यांकन एकत्रित मूल्यांकानांमध्ये धरू नये आणि त्यांना केवळ श्रेणी द्यावी असा निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे. हा निर्णय चुकीचा आहे आणि तो शासनाने विनाविलंब मागे घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मनसेच्यावतीने करण्यात आली आहे.

याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने बेकायदेशीरपणे कर्जधारक शेतकऱ्यांच्या जमिनींच्या जप्ती आणि लिलाव सुरु केले आहेत. आधीच अवकाळी पाऊसासारख्या नैसर्गिक आपत्तीने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला अजून किती नाडणार? ह्या शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालायचं काम सरकारने करायला हवं आणि त्यासाठी फक्त नाशिकमध्ये नाही तर सर्व कर्जधारक शेतकऱ्यांना व्याजात सूट द्यायला हवी. अशी मागणीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली.

अवकाळी पाऊस, वाढती मजुरी, वाढलेलं तापमान ह्यामुळे कोकणातील काजू उत्पादकांचं अतोनात नुकसान झालं आहे. उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने आज काजू उत्पादक, काजू विकत आहे. पार मेटाकुटीला आलेल्या काजू शेतकऱ्याला शासनाने तातडीने हमीभाव जाहीर करायला हवा. तसेच, दादर येथील मासळी मंडईतील व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित आहे. इथल्या व्यापाऱ्यांची मागणी आहे की त्यांना दादर तुळशी पाईप रोड येथील जुन्या मार्केटमध्ये व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी.  मासे व्यापाऱ्यांच्या या मागणीचं निवेदन आज मुख्यमंत्र्यांना मनसेने दिले.

याशिवाय वरळी येथील बी.डी.डी. चाळींचा पुनर्विकास हा रहिवाशांच्या संमतीने व समन्वयाने व्हावा, अशी रहिवाशांची मागणी आहे. रहिवाशांची ही मागणी अतिशय योग्य आहे. हा पुनर्विकास पारदर्शक पद्धतीने व्हायला हवा.  रहिवाशांच्या या मागण्यांचं निवेदनही आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना देण्यात आलं आहे.

A delegation of MNS led by Raj Thackeray met Chief Minister Eknath Shinde

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात