जाणून घ्या काय आहे प्रकरण? ; अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : महाराष्ट्रात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. औरंगजेबाच्या जन्मस्थानाचा उल्लेख करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. A case has been filed against Sanjay Raut for making controversial statements about Prime Minister Modi
एबीपी माझाच्या वृत्तानुसार, शिवसेनेचे (उबाठा) प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधात अहमदनगरमधील कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल अतुल काजळे यांनी शुक्रवारी फिर्याद दिली आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत जिल्हा निवडणूक शाखेने कोतवाली पोलिसांना राऊत यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव दिला.
या अंतर्गत राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राऊत यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम १७१ (सी) ५०६ आणि लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १२३ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय प्रकरण आहे?
महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात संजय राऊत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी 8 मे रोजी सायंकाळी संजय राऊत अहमदनगरमध्ये होते.
दरम्यान, राऊत यांनी पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले, ‘औरंगजेबचा जन्म नरेंद्र मोदींच्या गावात झाला आहे, इतिहास पाहा. अहमदाबादच्या पुढे दाहोद नावाचे गाव आहे. औरंगजेबाचा जन्म तिथेच झाला. म्हणूनच गुजरातमधले ते (पंतप्रधान नरेंद्र मोदी) आपल्याशी औरंगजेबासारखे वागतात.
संजय राऊत पुढे वादग्रस्त विधान करत म्हणाले की, ‘लक्षात ठेवा आम्ही याच महाराष्ट्रात एका औरंगजेबाला गाडले आहे. तो औरंगजेब महाराष्ट्र जिंकण्यासाठी 27 वर्षे लढत होता आणि अखेर आपण त्या औरंगजेबाला याच महाराष्ट्रात गाडून त्याची कबर खणली, मग नरेंद्र मोदी कोण?
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App