विशेष प्रतिनिधी
मुंबई : अनोळखी फोन आल्यानंतर आज मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात खळबळ उडाली. वास्तविक, तीन दहशतवादी मुंबईत घुसल्याचा दावा कॉलरने केला होता. हे दहशतवादी एकता नगरमध्ये लपले असल्याचे फोनवर सांगण्यात आले होते.A call from an unknown person to the Mumbai Police that three terrorists are hiding in Mumbai
मात्र, तपासाअंती ही माहिती खोटी असल्याचे आणि फोन करणारा हा दारूच्या नशेत असल्याचे पोलिसांना आढळून आले. लक्ष्मण ननावरे असे आरोपीचे नाव असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध भादंवि कलम १८२ आणि ५०५ (१) (बी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अगोदरही मुंबईत दहशतवादी हल्ला, बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली होती. या धमकीनंतर मुंबई पोलीस विभागात खळबळ माजली होती. एका व्यक्तीने मुंबईत दहशतवादी हल्ला करण्याची धमकी दिली होती. हा फोन मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षात आला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App