प्रतिनिधी
नागपूर : गेल्या महिन्यापासून दक्षिण गडचिरोलीतील जंगल परिसरात नक्षलवादी पुन्हा सक्रीय झाले आहेत. काल (रविवारी) सायंकाळी गडचिरोलीतील अहेरी येथे नक्षलवादी आणि पोलिसांत मोठी चकमक झाली. २० ते २५ नक्षवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्याला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी पोलीसांनी नक्षलवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त केला. A big clash between Naxalites in Gadchiroli
नक्षलवाद्यांनी काढला पळ
दक्षिण गडचिरोलीत काल सायंकाळच्या वेळी नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये मोठी चकमक झाली. भामरागड आणि आलापल्ली या मार्गावरील वेडमपल्ली जंगल परिसरात पोलिसांनी टीम गस्त घालत होती. त्याच दरम्यान लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्यावेळी पोलिसांनी नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी त्या भागातून पळ काढला. या भागात २० ते २५ नक्षलवादी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
गडचिरोलीत 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याने वनवासींचा विश्वास आणि पोलिसांचाही आत्मविश्वास वाढला!!; टॉप कॉप प्रवीण दीक्षित यांचे प्रतिपादन
ही मोठी चकमक झाल्यानंतर पोलिसांनी या भागाचा तपास केला. त्यावेळी पोलिसांना नक्षलवाद्यांचे भरमार बंदूक, पिस्तूल, वॉकी टॉकी, पुस्तके, औषधे असे साहित्य आढळून आले. या घटनेनंतर या भागात पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे.
मागील महिन्यात डिसेंबरमध्ये देखील दक्षिण गडचिरोलीमध्ये एटापल्ली आणि भामरागड जंगल परिसरात नक्षलवाद्यांची मोठ्या प्रमाणात हालचाल सुरू असल्याचे समजले होते. नक्षलवादी घातपाताच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे या भागात सतर्कतेच्या दृष्टीने अतिरिक्त पोलीसबळ तैनात करण्यात आले आहे. तसेच यापूर्वी नक्षलवाद्यांचा वरिष्ठ नेता गिरीधरने या जंगल भागात बैठक घेतल्याचे समोर आले होते. त्यामुळे या भागात घातपाताच्या शक्यतेने पोलिसांच्या सर्वत्र यंत्रणा सतर्क झाल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App