RSS Swayamsevak Narayan Dabhadakar : कोरोनाच्या भयंकर उद्रेकामुळे प्रत्येक ठिकाणी बेड, ऑक्सिजनसाठी मारामार सुरू आहे. अनेक शहरांत हीच परिस्थिती आहे. जो-तो आपले प्राण वाचवण्याची धडपड करतोय, अशा परिस्थितीत इतरांचा विचार करणार तरी कोण? पण नागपुरातील एका घटनेने नि:शब्द व्हायले होते. स्वत: अत्यवस्थ असूनही तरुणासाठी आपला बेड देणाऱ्या दाभाडकर काकांची ही हकिगत मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 85-year-old COVID-positive RSS Swayamsevak Narayan Dabhadakar gave up his bed and life so another person can live in Nagpur
विशेष प्रतिनिधी
नागपूर : कोरोनाच्या भयंकर उद्रेकामुळे प्रत्येक ठिकाणी बेड, ऑक्सिजनसाठी मारामार सुरू आहे. अनेक शहरांत हीच परिस्थिती आहे. जो-तो आपले प्राण वाचवण्याची धडपड करतोय, अशा परिस्थितीत इतरांचा विचार करणार तरी कोण? पण नागपुरातील एका घटनेने नि:शब्द व्हायले होते. स्वत: अत्यवस्थ असूनही तरुणासाठी आपला बेड देणाऱ्या दाभाडकर काकांची ही हकिगत मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नागपुरातील 85 वर्षांचे संघाचे स्वयंसेवक दाभाडकर काका यांच्या अपूर्व त्यागामुळे प्रत्येकाचा कंठ दाटून येतोय, त्याचबरोबर अभिमानही वाटतोय. वयोवृद्ध नारायण दाभाडकर यांना कोरोनाची लागण झाल्यावर तेव्हा त्यांच्या कन्येने त्यांना बेड मिळावा यासाठी दिवसदिवस प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अखेर त्यांना इंदिरा गांधी रुग्णालयात एक बेड मिळाला. परंतु एवढ्या वेळात त्यांची ऑक्सिजन पातळली खूप खालावली होती.
When he reached the hospital with his grandson-in-law in an ambulance, Dabhadkar kaka was out of breath. While he was waiting for the admission formalities to be completed, he saw a woman crying and begging for a bed for her husband who was in his 40s. His kids were crying — Shefali Vaidya. 🇮🇳 (@ShefVaidya) April 26, 2021
When he reached the hospital with his grandson-in-law in an ambulance, Dabhadkar kaka was out of breath. While he was waiting for the admission formalities to be completed, he saw a woman crying and begging for a bed for her husband who was in his 40s. His kids were crying
— Shefali Vaidya. 🇮🇳 (@ShefVaidya) April 26, 2021
दाभाडकर काकांना रुग्णवाहिकेतून इंदिरा गांधी रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा त्यांना श्वास घेण्यासाठी खूप त्रास होत होता. त्यांच्या दवाखान्यात दाखल करण्याची औपचारिक प्रक्रिया सुरू होती तेव्हा त्यांना एक महिला अश्रू ढाळताना दिसली. त्यांचा 40 वर्षीय पतीला बेड मिळावा यासाठी त्या याचना करत होत्या. त्यांची मुलेही रडत होती.
After some hesitation, she accepted his decision. Dabhadkar kaka signed the consent form saying he was forfeiting the bed in for the young man and returned home. He died 3 days later! Once a Sangh swayamsevak, always a swayamsevak! #truestory told by @shivanidanibjym — Shefali Vaidya. 🇮🇳 (@ShefVaidya) April 26, 2021
After some hesitation, she accepted his decision. Dabhadkar kaka signed the consent form saying he was forfeiting the bed in for the young man and returned home. He died 3 days later! Once a Sangh swayamsevak, always a swayamsevak! #truestory told by @shivanidanibjym
हे पाहून दाभाडकर काकांनी लगेच निर्णय घेतला. काका डॉक्टरांना म्हणाले, मी ८५ चा आहे, माझे जे काही आयुष्य होते ते झाले आहे, ह्या तरुणाचे वाचणे जास्त महत्वाचे आहे, मला बेड नको तुम्ही ह्यांना द्या. जावयाने समजवण्याचा प्रयत्न केला, डॉक्टरांनी परिस्थिती सांगितली, कि तुम्हाला आता उपचार खूप महत्त्वाचे आहे आणि पुन्हा बेड मिळेल का माहित नाही, काकांनी ताईला फोन केला आणि सांगितले मी घरी येतो, तेच उचित आहे. ताई पण शेवटी ह्याच काकांची मुलगी… ज्या बापासाठी आकाश पाताळ एक करून बेड मिळवला ते म्हणतात कि बेड नको ह्याला काय अर्थ आहे…. पण त्यांनासुद्धा ते समजले, डॉक्टरांना कन्सेंट लिहून दिला कि आम्ही आमच्या मर्जीने जात आहोत, जावई त्यांना घरी घेऊन आले.
घरी आल्यावर तीन दिवसांनंतर ते अनंतात विलीन झाले. दाभाडकर काकांची ही हकिगत प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य यांनी प्रकाशात आणली आहे. दाभाडकर काकांची ही कहाणी प्रत्येकाला अस्वस्थ करून अंतर्मुख करायला भाग पाडत असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. समोर काळ उभा असूनही संयम ढळू न देता त्यागवृत्ती जोपासणाऱ्या दाभाडकर काकांच्या निधनामुळे मने सुन्न झाली आहेत.
85-year-old COVID-positive RSS Swayamsevak Narayan Dabhadakar gave up his bed and life so another person can live in Nagpur
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App