drinking hand Sanitizer : राज्यात लॉकडाऊन लागू असल्याने मद्यशौकिनांची मोठी अडचण झाली आहे. त्यातच दारूचे व्यसन जडलेल्या काहींनी दारू समजून सॅनिटायझरचे प्राशन केले. यामुळे त्यांना जीव गमवावा लागला आहे. ही धक्कादायक घटना यवतमाळच्या वणीमध्ये घडली. एकूण सात जणांना सॅनिटायझर प्यायल्याने जीव गमवावा लागला आहे. 7 died after drinking hand Sanitizer in Vani yavatmal
वृत्तसंस्था
यवतमाळ : राज्यात लॉकडाऊन लागू असल्याने मद्यशौकिनांची मोठी अडचण झाली आहे. त्यातच दारूचे व्यसन जडलेल्या काहींनी दारू समजून सॅनिटायझरचे प्राशन केले. यामुळे त्यांना जीव गमवावा लागला आहे. ही धक्कादायक घटना यवतमाळच्या वणीमध्ये घडली. एकूण सात जणांना सॅनिटायझर प्यायल्याने जीव गमवावा लागला आहे.
Maharashtra: Seven people died in Yavatmal's Wani after consuming hand sanitiser as the liquor shops were closed. Police say, "Matter is being investigated. All of them were labourers. They consumed hand sanitiser when they couldn't get alcohol." pic.twitter.com/Asv8e8f3FX — ANI (@ANI) April 24, 2021
Maharashtra: Seven people died in Yavatmal's Wani after consuming hand sanitiser as the liquor shops were closed. Police say, "Matter is being investigated. All of them were labourers. They consumed hand sanitiser when they couldn't get alcohol." pic.twitter.com/Asv8e8f3FX
— ANI (@ANI) April 24, 2021
लॉकडाऊनमुळे दारूची दुकाने बंद आहेत. व्यसन लागलेल्या या मजुरांनी न राहवून सॅनिटायझर प्राशन केले. यानंतर त्यांना त्रास सुरू झाला. यातील तिघांचा घरीच, तर उर्वरित चार जणांचा रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला. दत्ता लांजेवार, नूतन पाथरटकर, गणेश नांदेकर, संतोष मेहर, सुनील ढेंगळे अशी मृतांतील पाच जणांची नावे आहेत.
हँड सॅनिटायझर चुकून तोंडामध्ये गेल्यास अनेक गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. विषाणू नष्ट करण्यासाठी कामाला येणारे सॅनिटायझर पोटात गेल्यास विषबाधा होते. यामुळे ते चुकूनही तोंडात जाता कामा नये. विशेषतः लहान मुलांना वापर करताना विशेष काळजी घेतली पाहिजे. कोरोना विषाणूच्या साथीमध्ये स्वतःला वाचवायचे असेल तर हात धुणे आवश्यक आहे. पण साबण आणि पाणी उपलब्ध असल्यास हँड सॅनिटायझरचा वापर करणं टाळा. एखाद्या गोष्टीचा मर्यादित प्रमाणात वापर केल्यास त्यापासून फायदे मिळतात. पण कोणत्याही गोष्टीच्या अतिवापराचे दुष्परिणाच होतात. त्यामुळे सॅनिटायझर तर चुकूनही प्राशन करू नका.
7 died after drinking hand Sanitizer in Vani yavatmal
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App