विशेष प्रतिनिधी
मुंबई – धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या ६ जिल्हा परिषदांतील ८४; तर त्यांतर्गतच्या ३८ पंचायत समित्यांतील १४१ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ६३ टक्के मतदान झाले.63 percent voting in ZP election
सर्व ठिकाणी बुधवारी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होईल.प्राथमिक माहितीनुसार जिल्हानिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी अशी: धुळे- ६०, नंदुरबार- ६५, अकोला- ६३, वाशीम- ६५, नागपूर- ६० आणि पालघर- ६५. एकूण सरासरी- ६३.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम, नागपूर आणि पालघर या ६ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या ३८ पंचायत समित्यांतील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील सदस्यांची पदे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे या ६ जिल्हा परिषदेच्या ८५ निवडणूक विभागांची आणि पंचायत समित्यांच्या १४४ निर्वाचक गणांतील जागा रिक्त झाल्या होत्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App