Manpada Police Kalyan : नव्याने उभारणी होत असलेल्या गृहसंकुलात लावल्या जाणाऱ्या 78 एसी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना डोंबिवलीत घडली होती. धक्कादायक म्हणजे पाच चोरट्यांनी या एसी भाजीपाल्यासारख्या रस्त्यावर विकल्या. मानपाडा पोलिसांनी शिताफीने पाचही चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरलेल्या एसीपैकी 20 एसी हस्तगत केल्या आहेत. 5 youth Arrested For stealing 78 ACs And Selling on Street by Manpada Police Kalyan
विशेष प्रतिनिधी
कल्याण : नव्याने उभारणी होत असलेल्या गृहसंकुलात लावल्या जाणाऱ्या 78 एसी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना डोंबिवलीत घडली होती. धक्कादायक म्हणजे पाच चोरट्यांनी या एसी भाजीपाल्यासारख्या रस्त्यावर विकल्या. मानपाडा पोलिसांनी शिताफीने पाचही चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरलेल्या एसीपैकी 20 एसी हस्तगत केल्या आहेत.
कल्याण शीळ रस्त्यावर दावडी परिसरात रिजेन्सी अनंतम् हे गृह संकुल उभारण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक फ्लॅटमध्ये तीन एअर कंडीशनर लावून देण्याचे काम सुरू आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात गृहसंकुलाच्या प्रत्येक फ्लोअरवर एसी आणून ठेवल्या होत्या. 21 ऑगस्ट रोजी सुपरवायझरला लक्षात आले की, 78 एसी गायब आहेत. त्यांनी त्वरित याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात केली.
डीसीपी विवेक पानसरे एसीपी जे. डी. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अविनाश वनवे यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासात प्राथमिक माहिती समोर आाली की, 20 ऑगस्ट रोजी विनोद महतो हा तरुण गृह संकुलाच्या वॉचमनला भेटला होता. त्यानेच ही चोरी केली असेल. कारण तो काही दिवसापूर्वी गृहसंकुलात काम करत होता. नुकतेच त्याने काम सोडले होते. त्याची ओळख असल्याने त्याला कोणी हटकले नाही. मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिस अधिकारी वनवे यांनी तपासाची सूत्रे फिरविली.
या प्रकरणात रहेमान खान आणि दीपक बनसोडे या दोघांना ताब्यात घेतले. हे दोघे खासगी कॉलसेंटरमध्ये वाहन चालक आहेत. त्यानंतर पोलिसांनी विनोद महतो, सलीम रशीद आणि आदील कपूर या तिघांनाही ताब्यात घेतले. या पाचही जणांनी मिळून जवळपास 78 एसी चोरी केल्या. त्यापैकी 20 एसी पोलिसांनी हस्तगत केल्या आहे. धक्कादायक या चोरटय़ांनी रस्त्यावर उभे असलेल्या फेरीवाल्यासारख्या या एसी वसईत विकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करीत आहेत. या पाचही जणांनी कमी वेळेत जास्त पैसे कमाविण्याच्या नादात हा गुन्हा केल्याचे उघड झाले आहे.
5 youth Arrested For stealing 78 ACs And Selling on Street by Manpada Police Kalyan
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App