विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने कोल्हापूर येथील ४० रोजंदारी कर्मचाऱ्याना नोटिस बजावली आहे. आणि २४ तासात कामावर हजर न झाल्यास कामावरून कमी केले जाईल असे लिहिले आहे. सदर नोटीस कोल्हापूरमधील डिविजनल कंट्रोलर रोहीत पलंगे यांनी दिली आहे. परंतु कर्मचारी अजूनही आंदोलन करत आहेत. आंदोलनाचा आजचा दहावा दिवस आहे. आजपर्यंत मंडळाने कोल्हापूर विभागातील ४५ कर्मचाऱ्याना निलंबित केले आहे.
40 daily wagers in kolhapur received notices from MSRTC
निजामशाहीमुळे ST कर्मचाऱ्यानं आत्महत्येचा मार्ग स्वीकारला तर याला ठाकरे सरकार जबाबदार राहील – आमदार गोपीचंद पडळकर
परिवहन मंडळाच्या कामगार संघटनेचे उत्तम पाटील म्हणाले, “परिवहन मंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी गेले दहा दिवस आंदोलन करत आहोत. आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी परवानगी मागितली होती. पोलीसांनी आम्हाला रोखले. तरी आम्ही जवळच्या हॉलमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले.” ते म्हणाले की, “निलंबन आदेश आंदोलकांना दिले गेले तर आम्ही आंदोलनाची तीव्रता वाढवू. राज्य सरकार आमची पिळवणूक करू शकत नाही.”
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App