विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात भीषण अपघातात भरधाव कारने उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली आहे. या तीन जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. 3 friends died on the spot
उसाच्या ट्रॉलीला पाठीमागे रिफ्लेक्टर नसल्याने हा अपघात घडला आहे.राहुल सुरेश आळेकर (वय २२ रा. श्रीगोंदा), केशव सायकर (वय २२ रा. काष्टी) आणि आकाश रावसाहेब खेतमाळीस (वय १८ रा. श्रीगोंदा), अशी त्या तीन मित्रांची नावं आहेत.
मृत राहुल आणि आकाश हे दोघं आपला मित्र केशव सायकर याला त्याच्या गावी काष्टी याठिकाणी सोडवण्यासाठी जात होते. रात्री एकच्या सुमारास हॉटेल अनन्यासमोरून जात असताना चालकाला समोर असणाऱ्या ट्रॉलीचा अंदाज आला नाही.
तसेच कारचा वेगही अधिक असल्याने कारची उसाच्या ट्रॉलीस पाठीमागून जोरदार धडक बसली आहे. हा अपघात इतका भीषण होता, की या अपघातात कारमधील तिघेही जागीच ठार झाले आहेत. तसेच कारचा अक्षरशा चक्काचूर झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App