मुंबई मेट्रोतून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना 25 % सवलतीत प्रवास!!

प्रतिनिधी

मुंबई : मुंबई मेट्रोमधून आता ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. १ मे, महाराष्ट्र दिनापासून २५ % सवलत त्यांना मिळेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी केली आहे. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (मुंबई वन) वापरणाऱ्या या श्रेणीतील हजारो प्रवाशांना ही सवलत मिळणार आहे.25% Discount for Senior Citizens, Disabled and Students in Mumbai Metro!!

महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि MMRDA यांच्यातफे महाराष्ट्र दिनाची ही भेट मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना ४५ किंवा ६० ट्रिपसाठी मुंबई वन पासावर ही सवलत मिळेल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांच्या गरजा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आम्ही मुंबई मेट्रो नेटवर्क तयार केले आहे, त्यामुळे त्यांना या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ मिळणे आवश्यक आहे. आम्ही यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत केला आहे तर महिलांना सुद्धा एसटी बसेसमधून ५० टक्के प्रवास सवलती दिली आहे. सामाजिक भावनेतून हे निर्णय आम्ही घेतले असून मेट्रो प्रवासातील या सवलतीमुळे देखील अधिक संख्येने लोक यातून प्रवास करतील असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.



 यांना मिळणार सवलत –

  • ६५ वर्षांवरील वरिष्ठ नागरिक, इयत्ता १२ वी पर्यंत शिकणारे विद्यार्थी आणि कायमस्वरूपी दिव्यांग लोकांसाठी ही सवलत आहे.
  •  या तीन श्रेणीतील प्रवाशांना सवलतीसाठी काही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.
  •  दिव्यांगांसाठी सरकारी/वैद्यकीय संघटनेचे प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयाचा पुरावा आणि विद्यार्थ्यांसाठी पॅन (विद्यार्थी किंवा पालक पॅन) सोबत शाळा ओळखपत्र यासारखी वैध कागदपत्रे आवश्यक आहेत.

 इथे मिळणार सवलत 

  •  या सर्व सवलती मेट्रो लाइन २ ए आणि ७ च्या मेट्रो स्टेशनवरील कोणत्याही तिकीट खिडकीत आवश्यक कागदपत्र दिल्यावर मिळू शकतील.
  • नवीन आणि पूर्वी खरेदी केलेल्या मुंबई-1 कार्डवर देखील सवलत असेल तसेच याला ३० दिवसांची वैधता असेल.
  • मुंबई 1 कार्ड रिटेल स्टोअर, पेट्रोल पंप आणि बेस्ट बस प्रवासादरम्यान देखील वापरले जाऊ शकते व रिचार्जही करता येते.

25% Discount for Senior Citizens, Disabled and Students in Mumbai Metro!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात