वृत्तसंस्था
नागपूर : राज्यात वाघ आणि बिबट्यांची शिकार मोठ्या प्रमाणात झाल्याचे उघड झाले आहे. गेल्या चार वर्षात वीजप्रवाह आणि विषप्रयोगामुळे २४ वाघ आणि ५६ बिबटे मृत्यू पावले आहेत. शिकारी रोखण्यात वनखात्याची यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.24 tigers and 56 leopards hunted in the state in four years; Failure of Forest Department to prevent deaths
नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना शिकारीच्या प्रकरणांची माहिती वनखात्याने दिली आहे. वाघ आणि बिबट्यांच्या अनेक शिकारी उघडकीस आल्या नाहीत. त्यामुळे वाघ आणि बिबट्यांच्या मृत्यूचा आकडा अधिक असू शकतो.मागील दोन महिन्यात नागपूर विभागाने कारवाई करून २९ आरोपींना अटक केली आहे.
मानव-वन्यजीव संघर्ष हे एक शिकारीचे कारण आहे. बहेलिया टोळीची धरपकड केल्यानंतर शिकारीची प्रकरणे कमी झाली. पण गावात येणारे वाघ-बिबटे, त्यांचे माणसांवर आणि जनावरावर होणारे हल्ले, शेतपिकाचे नुकसान यामुळे स्थानिकांनी या वन्यप्राण्यांना मारण्यासाठी विषप्रयोग, वीजप्रवाहाचा वापर सुरू केला.
राज्यात एकीकडे वाघांची संख्या वाढत असताना दुसरीकडे वाघांच्या मृत्यूमध्येही राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिकारींचे प्रमाण अधिक आहे. वन खात्याची यंत्रणा वाघ, बिबट्यांच्या संरक्षणात कमी पडत आहे बिबट्यांच्या मृत्यू आणि शिकारीचे प्रमाण अधिक आहे.
त्यामुळे ज्या वाघ आणि बिबट्यांच्या बळावर व्याघ्रप्रकल्प आणि अभयारण्यात पर्यटन सुरू आहे, त्यांच्या संरक्षणासाठी खात्याने ठोस उपाययोजनांची मागणी होत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App