प्रियकर व प्रियेसी यांच्यात किरकाेळ कारणावरुन झालेल्या वादात प्रियेसीने तिच्या मामांना फाेन करुन बाेलवून घेतले. त्यानंतर प्रियेसीचे मामा आणि प्रियकर यांच्यात सुरु झालेली भांडणे साेडविण्याकरिता मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा शरीरावर तलवारीने वार करुन त्याचा खून करण्यात आल्याचा प्रकार दत्तवाडी परिसरातील लाेकमान्यनगर परिसरात घडला आहे. 21yrs youth Murder case happened in lokmanyanagar Dattawadi area, police registered crime against the accused
विशेष प्रतिनिधी
पुणे : प्रियकर व प्रियेसी यांच्यात किरकाेळ कारणावरुन झालेल्या वादात प्रियेसीने तिच्या मामांना फाेन करुन बाेलवून घेतले. त्यानंतर प्रियेसीचे मामा आणि प्रियकर यांच्यात सुरु झालेली भांडणे साेडविण्याकरिता मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा शरीरावर तलवारीने वार करुन त्याचा खून करण्यात आल्याचा प्रकार दत्तवाडी परिसरातील लाेकमान्यनगर याठिकाणी शुक्रवारी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
प्रसाद गणेश गायकवाड (वय-२१,रा.दत्तवाडी,पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तरुणीचा प्रियकर राहुल शांतराम वाळंज (२२) याने विश्रामबाग पाेलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार संबंधीत तरुणी पाैर्णिमा बरगुडे (२२), तिचे मामा तुकाराम दारवटकर (४१), माऊली दारवटकर (३८) यांच्यासह इतर पाच ते सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाैर्णीमा बरगुडे ही एक ग्रॅम वजनाचे साेन्याचे दागिने विक्री करणाऱ्या साेनसराफ दुकानात कामास आहे तर तिचा प्रियकर राहुल वाळंज याचे नवी पेठेत रेडीमेड कपडे विक्रीचे पार्टनरशीप मध्ये दुकान आहे. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याचे सुमारास पाैर्णिमा हिला लाेकमान्यनगर येथील घरी साेडण्याकरिता दुकानातील मॅनेजर दुचाकीवर आला हाेता. तिला साेडून मॅनेजर पुन्हा घरी परतत असल्याचे पाहून राहुल वाळंज याला संशय आला आणि त्याने त्यास थांबवून त्याची विचारणा सुरु करत वाद घालण्यास सुरुवात केली. पाैर्णीमा हिच्यासाेबत तु का फिरताेस असे म्हणत त्याने भांडणे सुरु केल्याने पाैर्णिमा हिने तिचे मामा तुकाराम दारवटकर व माऊली दारवटकर यांना संबंधित जागी बाेलवून घेतले.
सदर मामा त्यांच्या पाच ते सहा साथीदारां साेबत तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी राहुल वाळंज व त्याचा मित्र राज पवार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. राज पवार याने तुकाराम दारवटकर यांना धरुन ठेवले असल्याचे पाहून त्याठिकाणावरुन जात असलेल्या गणेश ऊर्फ प्रसाद गायकवाड याने सदर भांडणे पाहून ती मध्यस्थी करण्यासाठी आला. त्यावेळी तुकाराम दारवटकर याने त्याच्या कमरेला लावलेली दीडफूटाची तलवार बाहेर काढून ती गायकवाड याच्या डाव्या बाजूच्या छातीचे बरगडीत भाेसकली. या हल्लयामुळे गणेश गारयकवाड जखमी हाेऊन जागेवर पडला अाणि त्याचा मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच, तात्काळ विश्रामबाग पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक सुनील माने यांचे पथक घटनास्थळी दाखल हाेऊन त्यांनी घटनेचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेवून ससून रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठवला. आराेपी तुकाराम दारवटकर हा प्रिटिंग प्रेस मध्ये काम करताे तर खून झालेला गणेश गायकवाड हा विवाहित हाेता. या खुनाचा पुढील तपास विश्रामबाग पाेलीस करत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App