विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराला सामान्य जनता कंटाळली आहे. मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाचे प्रश्न वेळेत सोडवावेत, यासाठी विधानसभेतील सर्व 140 मराठा आमदारांनी आता एकत्र येत आवाज उठवावा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.140 MLAs of Maratha community should come together for reservation and raise their voice, appeal of Chandrakant Patil
पाटील म्हणाले, राज्यातील 30 टक्के जनता मराठा समाजातील आहेत. विधिमंडळात मराठा समाजाचे 140 आमदार आहेत. तरीही मराठा आरक्षणाचा प्रश्न अजूनही रखडलेला आहे. त्यामुळे या सर्व 140 आमदारांनी आता विधानसभेत आरक्षणासाठी एकी दाखवत आवाज उठवण्याची गरज आहे.
तसेच, मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंबंधी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी आझाद मैदानात उपोषण केले. त्यानंतर त्यांच्या मागण्या पुर्ण करण्याचे आश्वासन देत सरकारने त्यांना उपोषण सोडायला लागले. खासदार संभाजी राजेंनी मागण्या पुर्ण करण्याबाबत सरकारला दिलेले वेळापत्रक केव्हाच मागे पडले आहे. त्यामुळे संभाजी राजेंनी सरकारची कॉलर पकडावी.
मराठा समाजासह सरकारने धनगर, ओबीसी व अनुसूचित जातींचीही फसवणूक केली आहे. धनगर व ओबीसी आरक्षणाचा प्रश्नही अद्याप सुटलेला नाही. या आरक्षणावर कायदा केला तर तो टिकेल की नाही, याबाबतही सरकार साशंक आहे.
मराठा समाजातील मुलांना आश्वासनानंतरही अद्याप वसतिगृहाची सुविधा दिली जात नाही, त्यांचे निम्मे शुल्कही माफ झालेले नाही. त्यामुळे या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी भाजप विधानसभेत स्थगन प्रस्ताव आणणार, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
एसटी कर्मचाºयांच्या संपावर पाटील म्हणाले, संप किती काळ चालू द्यायचा याकडे सरकारने लक्ष दिले नाही. आता भाजपची संपाला फुस आहे, असा आरोप सरकारकडून केला जात आहे. तर, होय एसटी संपाला आमची फुस आहे. कारण एसटी कर्मचाºयांच्या मागण्या न्याय आहेत. न्याय मागण्या तुम्ही पुर्ण करणार नाहीत का, अशा मागण्यांना आम्ही पाठिंबा दिला तर कुठे चुकले?
भ्रष्टाचाराच्या आरोपाखालील महाविकास आघाडीचे एक-एक नेते आता तुरुंगात जात आहेत. यापुढेही आणखी नेते तुरुंगात जातील. नवाब मलिकांना मंत्रिपदावरुन काढणार नाही, असे म्हण्णाºयांनी आता त्यांच्याकडील सर्व खाते काढून टाकले आहेत. काही दिवसांतच त्यांचे मंत्रिपदही जाईल.
महाविकास आघाडी सरकार खूप घाबरलेले आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. शेतकरी व शहरी भागांतील नागरिकही गैरसोयीमुळे त्रस्त झाले आहेत. सरकारला सर्वच प्रश्नांत अपयश येत आहे. आम्ही या सर्व मुद्द्यावर विधानसभेत आवाज उठवला आहे व यापुढेही सरकारला जाब विचारत राहू, असे पाटील म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App