राज्यातील १४ मराठी पोलीस बनले ‘आयपीएस’केंद्रीय गृह विभागाचे शिक्कामोर्तब

विशेष प्रतिनिधी

मुंबई : १४ मराठी पोलीस अधिकाऱ्यांच्या भारतीय पोलीस सेवेचा (आयपीएस) संवर्ग अखेर निश्चित झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा विषय रखडला होता. केंद्रीय गृह विभागाकडून त्यांच्या आयपीएस नामांकनावर शिकामोर्तब करण्यात आले. सध्या हे अधिकारी राज्यात विविध ठिकाणी कार्यरत आहेत.14 Marathi officers turned as IPS,Accepted by central home department

त्याबाबतचे सूचनापत्र (नोटिफिकेशन) नुकतेच जारी करण्यात आले. केंद्रीय गृह विभागाकडून राज्य पोलीस दलातील (मपोसे) अधिकाऱ्यांची सेवाजेष्ठता व अन्य अटींची पूर्ततेच्या आधारावर दरवर्षी ‘आयपीएस’ श्रेणीमध्ये निवडले जाते. त्यासाठीची प्रक्रिया संथगतीने होत असल्याने त्याला विलंब होत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत असते.



२०१९ व २०२० या वर्षाच्या निवडसूचीसाठी राज्य सरकारकडून अनुक्रमे ८ व ६ अधिकाऱ्यांच्या नावाचा अंतिम प्रस्ताव केंद्राकडे ४ महिन्यांपूर्वी पाठविला होता. यामध्ये सुमारे २० वर्षांपूर्वी राज्य पोलीस दलात उपाधीक्षक म्हणून रुजू झालेल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. केंद्राने प्रलंबित प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविला. या १४ जणांची आयपीएस सेवा ज्येष्ठता निश्चित केली जाईल.

आयपीएस बनलेल्या अधिकाऱ्यांची नावे :

२०१९ निवड सूची : एन ए अष्टेकर, मोहन दाहिलकर, विश्वास पानसरे, वसंत जाधव, स्मार्तन पाटील, एस डी. कोकाटे, प्रशांत मोहिते, संजय लाटकर २०२० निवड सूची : सुनील भारद्वाज, सुनील काडसने, संजय बारकुंड, डी. एस. स्वामी, अमोल तांबे व संग्रामसिंह निषाणदार.

14 Marathi officers turned as IPS,Accepted by central home department

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात