प्रतिनिधी
मुंबई : सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीत 3 पक्ष आहेत. पण 2024 पर्यंत त्यांचेच 12 पक्ष होतील आणि एक ना धड भाराभर चिंध्या उडतील, अशी घणाघाती टीका केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. मुंबईतल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 12 parties of 3 parties of Mahavikas Aghadi by 2024
मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित बैठकीत महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
त्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन या बैठकीची माहिती दिली. संपूर्ण देशात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग कोरोना काळात बंद पडले होते. फार मोठ्या प्रमाणावर त्यामुळे रोजगार कमी झाले होते. परंतु मोदी सरकारने 5 लाख कोटी रुपये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाला दिले आणि त्या निधीतून सर्वांना कर्ज वाटप करून हे उद्योग पुन्हा उभारण्यासाठी चालना दिली. आत्तापर्यंत गेल्या 2.5 वर्षात 3 लाख 76 हजार कोटी रुपये कर्ज वाटप करून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग पुन्हा उभारले आहेत आणि उत्पादन कोरोना काळापेक्षा अधिक होत आहे, अशी माहिती नारायण राणे यांनी दिली.
त्याच वेळी त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबद्दल भाष्य केले. संजय राऊत यांच्या बद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायला त्यांनी नकार दिला. उद्धव ठाकरेंवर त्यांनी नेहमीप्रमाणे टीका केली. पण महाविकास आघाडी संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नारायण राणे म्हणाले, की सध्या महाविकास आघाडी 3 पक्ष आहेत. 2024 च्या निवडणुकीपर्यंत त्यांचे 12 पक्ष होतील आणि त्यांची अवस्था एक ना धड भाराभर चिंध्या अशी होऊन जाईल, असे टीकास्त्र नारायण राणे यांनी सोडले.
बैठकीतले महत्त्वाचे निर्णय
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App