विनायक ढेरे
नाशिक : ज्येष्ठ नेते शरद पवारांनी जर भास्कर जाधवांच्या मार्फत बाराचा खेळ करून घेतला असेल, तर हे १२ आमदारांचे निलंबन वर्षभर टिकण्याची संभावना कमी वाटते. अर्थात ते मागे घेण्यामागे भाजपचे राजकीय कर्तृत्व कमी आणि महाराष्ट्रातली इतर राजकीय perminations – combinations जास्त महत्त्वाची ठरू शकतात. ती कशी ते पाहू… 12 BJP MLAs suspension; who will take initiative for political patch up? uddhav thackrey or devendra fadanavis?
जर शरद पवारांनी भाजपची ताकद कमी करण्याचा असा डाव आखला असेल, तर तो शॉर्ट टर्मसाठी शिवसेनेलाही उपयोगी असेल, हे उघड आहे. पण त्याच बरोबर १२ आमदारांच्या निलंबनाच्या निमित्ताने भाजपशी पुन्हा सुरू झालेला संवाद कमी होणे आणि त्याचवेळी हे सगळे पवारांनी घडवून आणले हे perception महाराष्ट्रात तयार होत राहणे शिवसेनेसाठी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासाठी लाँग टर्ममध्ये धोकादायक आहे.
उध्दव ठाकरे हे पवारांच्या काही गोष्टी ऐकत नाहीत. ते पवारांच्या ताटाखालचे अगदीच मांजर झाले नाहीत, हे perception महाराष्ट्रात राहणे ही शिवसेनेसाठी आणि स्वतः उध्दव ठाकरे यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. शिवसेनेच्या राजकारणाची भिस्त त्याच तर perception वर आधारलेली आहे. जे पवारांचे आहे, तेच थोड्या फार फरकराने उध्दव ठाकरेंचे आहे.
१२ आमदारांच्या निलंबनाच्या निमित्ताने भाजपची ताकद घटली, तर ती उध्दव ठाकरेंना हवीच आहे. पण त्यानिमित्ताने शिवसेना – राष्ट्रवादी यांच्या checks and balance मध्ये पवारांची बाजू वरचढ होऊ देणे उध्दव ठाकरेंना परवडणारे नाही. म्हणून कदाचित उध्दव ठाकरे हे भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याची खेळीही करू शकतील. भाजपला झटका देऊन झाला आहे. पण पवारांची यानिमित्ताने कायमची ताकद वाढायला नको, यासाठी त्यांना हे करावे लागण्याची शक्यता आहे. आणि तसेही महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही अशक्य हे मोदींच्या राजकीय गुरूंनी दाखवून दिलेच आहे…!!
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App