
प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडी सरकारला घरघर लागल्याचे पाहून उद्धव ठाकरे मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी कामाची प्रचंड तत्परता दाखवली आहे. 1770 कोटी रुपयांच्या कामांपैकी तब्बल 319 कोटींचा निधी वितरित केला आहे आणि दोन दिवसांत तब्बल 106 जीआर काढले आहेत. ही कामे प्रामुख्याने जलसंधारण आणि पाणी पुरवठा विभागाची आहेत. शिवसेनेच्या कोट्यातले मंत्री शंकरराव गडाख यांनी सर्वाधिक 23 जीआर काढले आहेत. 21 आणि 22 जून या दोन दिवसांमध्ये तब्बल 106 जीआर विविध मंत्र्यांनी काढले आहेत. 106 gr. 319 cr funds released within two days
याच दिवशी बुधवार, २२ जून २०२२ रोजी राज्य मंत्रिमंडळाचीही बैठक झाली. या बैठकीच्या आधी राज्य सरकारने तब्बल 35 अध्यादेश काढले. तर 21 जून २०२२ रोजी 63 अध्यादेश काढले. अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीच्या काळातील 2 दिवसांत तब्बल 106 अध्यादेश काढले आहेत.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजकीय गुन्हे मागे घेतले
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे निश्चित झाले. दुसऱ्या दिवशी स्वतः शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यातील विधानसभा बरखास्त होण्याची शक्यता आहे, असे ट्विट केले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या अधिकारात भरत गोगावले यांना मुख्यप्रपोद पदावर नियुक्त केले.
याच दिवशी महाविकास आघाडी सरकारची मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत सर्व राजकीय आणि सामाजिक आंदोलनाची गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोना संक्रमित झाल्यामुळे ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. या बैठकीत शिवसेनेचे केवळ ३ मंत्री उपस्थित होते,
मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मंत्री या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीच्या आधी महाविकास आघाडी सरकारने तब्बल 35 अध्यादेश काढले. तर 21 जून 2022 रोजी 63 अध्यादेश काढले. अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीच्या काळातील २ दिवसांत तब्बल 106 अध्यादेश काढले आहेत.
106 gr. 319 cr funds released within two days
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेला खिंडार : उद्धव ठाकरेंच्या इमोशनल ड्रामाला एकनाथ शिंदेंचे वास्तववादी उत्तर!!; अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडा!!
- फेसबूक स्क्रिप्ट राईटर : एकनाथ शिंदेंना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्याचा उद्धव ठाकरेंना शरद पवारांचा सल्ला!!
- शिवसेनेला खिंडार : मुख्यमंत्र्यांचे फेसबुक लाईव्ह हा बंडखोर आमदारांशी असफल संवाद; मुनगंटीवारांचे शरसंधान
- शिवसेनेला खिंडार : उद्धव ठाकरे उरले आता काँग्रेस – राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री!!