कर्मचाऱ्यांना वारंवार आवाहन करूनही ते रुजू न झाल्याने एसटी महामंडळाने निलंबनाची कारवाई केली.10,500 ST employees suspended; Waiting for employees to return
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मागील अडीच महिन्यांपासून विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर आहेत.दरम्यान संपावर गेलेल्या एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांपैकी 10,500 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.दरम्यान संपाबाबतच्या सुनावण्यांना हजर न राहिल्याने सातशे कर्मचारी बडतर्फ केले आहेत.
या मोठ्या कारवाईनंतर अनेक कर्मचाऱ्यांनी आगारात जाऊन रुजू करून घेण्याची विनंती केली मात्र मध्यवर्ती कार्यालयाने याबाबतची सूचना दिली नसल्याने आगारप्रमुखांनी त्यांना रुजू करून घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची परतीची वाट बंद झाली आहे.
यावेळी एका महिला एसटी कर्मचारी ने सांगितले की, “लॉकडाऊनमुळे पतीची नोकरी गेली आहे. घरभाडे थकले आहे, त्यामुळे मी स्वखुशीने कामावर रुजू होण्यास गेले होते. मात्र सोशल माध्यमांवर गलिच्छ भाषेत टीका करण्यात आली. त्यामुळे कामावर रुजू झाले नसल्याचे मुंबई विभागातील महिला कर्मचाऱ्यानी सांगितले.”
विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना वारंवार आवाहन केले होते.परंतु कर्मचाऱ्यांना वारंवार आवाहन करूनही ते रुजू न झाल्याने एसटी महामंडळाने निलंबनाची कारवाई केली.तरीही कर्मचारी संपावर ठाम आहेत.त्यामुळे एसटी महामंडळाने शिस्त आवेदन कार्यपद्धतीनुसार निलंबित कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई सुरू केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App