शिवसेना सोडणार नाही, मरेन पण शरण जाणार नाही; ईडी घरात दाखल झाल्यानंतर राऊतांचे ट्विट
प्रतिनिधी
मुंबई : 1034 कोटी रुपयांच्या पत्राचा घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने संजय शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरावर छापे घातले आहेत. ईडीच्या छाप्यांना जशी सुरुवात झाली आहे, तशी संजय राऊत यांची एका मागामाग एक ट्विट सुरू झाली आहेत. संजय राऊत यांच्या भांडुपच्या घराभोवती शिवसैनिकांनी घोषणाबाजी देखील केली आहे.1034 Crore mail scam: ED raids and Sanjay Raut’s tweets start!!
संजय राऊत यांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाले आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे. ईडीचे अधिकारी रविवारी सकाळी 7.00 वाजता संजय राऊत यांच्या भांडुपच्या घरी दाखल झाले आहेत. घरात ईडीचे पथक दाखल झाल्यानंतर संजय राऊतांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊतांचे ट्विट
रविवारी सकाळी घरात ईडीचे पथक दाखल झाल्यानंतर संजय राऊतांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तरीही शिवसेना सोडणार नाही…महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील, खोटी कारवाई..खोटे पुरावे, मी शिवसेना सोडणार नाही..मरेन पण शरण जाणार नाही…कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय..मी शिवसेनेसाठी लढत राहीन. जय महाराष्ट्र असे ट्वीट संजय राऊतांनी केले आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईतील 1034 कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. याच संदर्भातील चौकशीसाठी राऊत यांना ईडीने समन्स पाठवले होते. ईडीने यापूर्वी 11 कोटी 15 लाख 56 हजार 573 रुपयांची स्थावर मालमत्ता या प्रकरणामध्ये जप्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App