शिवनेरीवर भगवा ध्वज लावण्यासंदर्भात खासदार कोल्हे यांनी मंत्री रेड्डी यांच्याशी पत्रव्यवहार केला होता.100 feet saffron flag to be flown at Shivneri fort; MP Amol Kolhe called on Union Tourism Minister
विशेष प्रतिनिधी
जुन्नर : जुन्नर शहरातील शिवनेरी किल्ला अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांचे जन्मस्थळ असलेला किल्ला आहे. या किल्ल्याला मराठी मना मनात विशेष आदराचे स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या या शिवनेरी किल्ल्यावर १०० फुटी भगवा ध्वज फडकणार आहे.
यासाठीच्या परवानगीसंदर्भात खासदार अमोल कोल्हे यांनी आज केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट घेतली.शिवनेरीवर भगवा ध्वज फडकविण्यासाठी तत्काळ संमती द्यावी, यासाठी प्रसंगी नियमांत बदल करावा, असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.
तसेच कोल्हे यांनी यासाठी केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.याआधी शिवनेरीवर भगवा ध्वज लावण्यासंदर्भात खासदार कोल्हे यांनी मंत्री रेड्डी यांच्याशी पत्रव्यवहार केला होता.मात्र त्यावेळी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता.परंतु भारतीय पुरातत्व विभागाकडून परवानगी देण्यास वेळ लागत होता.त्यामुळे आज खासदार कोल्हे यांनी आज पर्यटन मंत्र्यांची भेट घेतली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App