फोन टाॅपिंगच काय?, माझ्या मुलांची इंस्टाग्राम अकाउंटस् “ते” हॅक करताहेत; प्रियांका गांधी यांचा खळबळजनक आरोप!!


वृत्तसंस्था

लखनऊ : केंद्रातील मोदी सरकार सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी, प्राप्तिकर खाते – आयटी, सीबीआय आणि अन्य तपास संस्थांचा गैरवापर करत आहेच, ते फोन टॅपिंगही करतात. पण आता माझ्या मुलांची देखील इंस्टाग्राम अकाउंटस् ते हॅक करत आहेत, असा खळबळजनक आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केला आहे. even hacking my children’s Instagram accounts, let alone phone tapping. Do they not have any other work

काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी आज दुपारीच लिंचींग हा शब्द 2014 नंतर आला, असे खळबळजनक वक्तव्य केले होते. त्यावरून राजकीय गदारोळ उठला असतानाच प्रियांका गांधी यांनी आपल्या मुलांची इंस्टाग्राम अकाउंटस् हॅक करण्याचा आरोप करून नवा राजकीय बॉम्ब फोडला आहे. त्या लखनऊ मध्ये पत्रकारांशी बोलत होत्या.

उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या नातेवाईकांवर ईडी आणि आयटीचे छापे पडत आहेत. याबाबत प्रश्न विचारले असता प्रियांका गांधी यांनी आपल्या मुलांची इंस्टाग्राम अकाउंटस् हॅक होत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. आता यावर सरकारच्यावतीने नेमके कोण आणि काय काय उत्तर देते हे पाहणे रंजक ठरणार आहे.

even hacking my children’s Instagram accounts, let alone phone tapping. Do they not have any other work

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात