शरद पवारांना देशाच्या पंतप्रधान पदी पाहण्याची सूचक इच्छा व्यक्त केली खासदार अमोल कोल्हे यांनी


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 81 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने वरळी येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांनी पंतप्रधान व्हावे अशी सूचक इच्छा व्यक्त केली आहे.

MP Amol Kolhe has expressed his desire to see Sharad Pawar as the Prime Minister of the country

कोल्हे म्हणतात, देशातील कुठल्याही नेत्याला आजही शरद पवार यांचे मार्गदर्शन लागते. दिल्लीमध्ये त्यांनी 40 वर्ष काम केले आहे. पण तरीदेखील त्यांना 5 लाख रुपयांचा सूट आणि हजारो रुपयांची मशरूम खावी लागत नाही. अशा शब्दांमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदी यांना टोलादेखील लगावला आहे.

पुढे ते म्हणतात की, शरद पवार हे शाहू महाराजांचे वैचारिक वारसदार आहेत. महिलांनी लष्करामध्ये काम करावे, राजकारणामध्ये महिलांना आरक्षण मिळावे या बाबतीत त्यांनी घेतलेले निर्णय हे अतिशय महत्त्वाचे होते. शरद पवार हे खऱ्या अर्थाने महात्मा फुलेंचे देखील वैचारिक वारसदार आहेत असे देखील मत त्यांनी यावेळी मांडले आहे.


Sharad Pawar Birthday : वाढदिवशी पवारांनी सांगितली कृषिमंत्री असतानाची आठवण, म्हणाले- बांधिलकी असलेले कार्यकर्ते राष्ट्रवादीचे वैशिष्ट्य


पुढे ते म्हणतात की, देशाला जेव्हा जेव्हा गरज होती, तेव्हा तेव्हा शरद पवारांच्या मार्गदर्शनाची गरज भासली होती. भूजमध्ये भूकंप आला होता त्या वेळी शरद पवार यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या कामाची वाहवा केली होती. पण सध्या देशाला सांप्रदायिकतेचे हादरे सहन करावे लागत आहेत. देश रक्तबंबाळ झाला आहे. अशा वेळी शरद पवार यांच्या मौल्यवान मार्गदर्शनाची गरज आहे.

पुढे ते म्हणाले, 26 खासदार असलेली व्यक्ती पंतप्रधानपदी बसू शकते तर 48 खासदार असलेल्या महाराष्ट्रातील व्यक्तीने देशाच्या पंतप्रधानपदी बसावे, असा विचार देखील त्यांनी यावेळी व्यक्त करत अतिशय सूचक पध्दतीने शरद पवार यांना पंतप्रधानपदी पाहायचं असल्याचा मानस बोलून दाखवला आहे.

MP Amol Kolhe has expressed his desire to see Sharad Pawar as the Prime Minister of the country

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण