विशेष प्रतिनिधी
अमरावती : शहरातील राजापेठ पोलिसांनी दसरा मैदान येथील एका अपारमेंटमध्ये छापा टाकून दहा किलो सोने जप्त केले. राजस्थान येथील तीन युवकाकडून तब्बल पाच कोटी रुपये किमतीचे दहा किलो सोने, पाच लाख ३९हजार रुपये रोख असा एकूण ५कोटी ५लाख रुपयांचे वर ऐवज जप्त करण्यात आला आहे. 10 kg of gold seizes Amravati; Major action of Rajapeth police
राज्यस्थान येथील तिन्ही युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. त्यांचेकडून कटरसह कच्च्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या असून त्यांचे कडून ठोस कागदपत्रे मिळून न आल्याने संशय वाढला आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली असून पुढील तपास राजापेठ पोलिस करीत आहे,तर हे तिन्ही युवक गेल्या चार वर्षांपासून अमरावतीतच राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून हे सोने चोरीचे आहे की हवाला मार्गाचे आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत. मात्र इतकं सोनं सापडल्याने अमरावती जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App