पवार म्हणाले, आम्ही काय “त्यांना” पुन्हा येऊ देतो…!!; पडळकर म्हणाले, वैराग्याच्या वयातही बगल मे छूरीच…!!


विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे मेट्रोच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप विशेषतः शरद पवार आणि भाजपचे नेते यांच्यातला वाद अधिक तीव्र झाला आहे. शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यातल्या कार्यक्रमांवर टीकास्त्र सोडून घेतले. त्याला भाजपच्या नेत्यांनी तितक्याच तिखट भाषेत प्रत्युत्तरे दिली. Pawar said, do we allow “them” to come again … !!; Padalkar said, even in the age of vairagya, there is only a knife next to me … !!

पण त्यानंतर शरद पवारांनी कालच्या उस्मानाबादच्या सभेत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना काही लोक म्हणाले मी पुन्हा येईन, पण आम्ही काय “त्यांना” परत येऊ देतो…!!, अशा खोचक शब्दांमध्ये टोचले आहे.

शरद पवार यांच्या टोचणीला भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडिओद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. एकीकडे शरद पवारांना आपल्या वयाच्या थोरलेपणाच्या मानाची अपेक्षा आहे आणि दुसरीकडे वयाच्या वैराग्याच्या काळात देखील ते बगल मे छूरी घेऊन फिरत आहेत, असे जोरदार टीकास्त्र गोपीचंद पडळकर यांनी सोडले आहे. 2019 च्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे 105 आमदार जनतेने निवडून दिले आणि शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले. दोघांचे मिळून 161 आमदार महायुतीचे उमेदवार म्हणून फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली निवडून आले आणि शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पावसात भिजूनही राष्ट्रवादीचे फक्त 54 आमदार निवडून आले, याकडे गोपीचंद पडळकर यांनी लक्ष वेधले आहे.



शरद पवार यांनी राष्ट्रवादी स्थापन राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन करून 25 वर्षे होत आली तरी त्यांना अजुन आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात बसवता आला नाही, असा टोलाही गोपीचंद पडळकर यांनी पवारांचे नाव घेऊन लगावला आहे.

शरद पवार यांना पुणे मेट्रोच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलावले नाही म्हणून वैफल्यग्रस्त होऊन शरद पवारांनी बहुजन हित साधणार्‍या देवेंद्र फडणवीस यांच्यावर राग धरून टीका केली आहे. माझ्यासारखा धनगराचा पोरगा, सदाभाऊ खोतांसारखा शेतकऱ्याचा पोरगा आणि राम सातपुते सारखा वंचिताचा पोरगा यांना देवेंद्र फडणवीसांनी राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणल्याने शरद पवारांसारख्या प्रस्थापितांच्या पोटात दुखत आहे, अशा शब्दांमध्ये पडळकर यांनी पवारांच्या उस्मानाबाद मधल्या भाषणाचे वाभाडे काढले आहेत.

Pawar said, do we allow “them” to come again … !!; Padalkar said, even in the age of vairagya, there is only a knife next to me … !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात