विशेष प्रतिनिधी
बीजिंग : कोरोनाच्या उमग झाल्याचे साऱ्या जगात बदनाम झालेल्या वुहान शहरात आज पदवीदान समारंभासाठी हजारो विद्यार्थ्यांनी हजेरी लावल्याने साऱ्या जगभर पुन्हा हे शहर चर्चेत आले आहे. यातील बहुतांश विद्यार्थ्यांच्या तोंडावर मास्क नव्हता.Wuhan comes in picture due to huge crowd
कोरोनाच्या साथीची पहिली नोंद २०१९च्या अखेरीस चीनच्या मध्य भागातील हुबेई प्रांताची राजधानी वुहान येथे झाली. एक कोटी दहा लाख लोकसंख्येच्या शहरात त्यावेळी अत्यंत कडक लॉकडाउन लागू करण्यात आले.
गेल्या एप्रिलमध्ये सुमारे ७६ दिवसांच्या खंडानंतर ते शिथिल करण्यात आले. शाळा, महाविद्यालये मात्र जास्त कालावधीसाठी बंद होती. गेल्या वर्षी पदवीदान समारंभांचे प्रमाण मर्यादित होते. वुहान विद्यापीठाचे बहुतांश वर्ग ऑनलाइन पद्धतीने झाले. प्रत्यक्ष उपस्थित राहिलेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी मास्क घातले होते.
नेव्ही ब्लू रंगाचा गाऊन आणि पदवीदान समारंभासाठीची खास टोपी घातलेल्या विद्यार्थ्यांची छायाचित्रे क्षणात साऱ्या देशात व्हायरल झाली. तसच जगातही त्याची जोरदार चर्चा सुरु झाली. गत वर्षात पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात सहभाग होता. यातील दोन हजार दोनशे विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे पदवीदान कार्यक्रमास उपस्थित राहता आले नव्हते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App