विशेष प्रतिनिधी
दिल्ली : इंद्रा नुई ह्या एक भारतीय-अमेरिकन आहेत. त्यांनी बिझनेस एक्झिक्युटिव्ह आणि पेप्सिकोच्या माजी अध्यक्षा म्हणूनही काम केले होते. त्यानी पेप्सीको कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणूनही काम केले होते. जगातील 100 प्रभावी व्यक्तिंमध्ये त्याच्या नावाचा समावेश बऱ्याच वेळा झाला आहे.
World’s one of the influential lady Indra nooyi also faced ban to office meeting due to saree?
नुकताच त्यांनी केलेले एक विधान चर्चेचा विषय बनले आहे. अमेरिकेतील बुज एलन हॅमिल्टन ह्या आयटी कंपनीत त्या आधी काम करायच्या. आपल्या विधानात त्या म्हणतात की, ज्यावेळी त्या अमेरिकेतील बुज एलन हॅमिल्टन ह्या आयटी कंपनीत काम करायच्या त्यावेळी त्यांना बऱ्याच क्लायंट मिटिंग साठी सहभागी करून घेतले जायचे नाही. कारण त्यांचा भारतीय पेहरावा साडी. त्या रोज ऑफिस मध्ये साडी नेसून जायच्या. आपल्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकात त्यांनी हा अनुभव लिहिला आहे.
साडी नेसल्यामुळे रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारला? शेफाली वैद्य यांचे ट्विट होतेय व्हायरल
नुकताच दिल्ली येथील रेस्टॉरंटमध्ये एका महिलेला साडी नेसलेली असल्यामुळे प्रवेश नाकारण्यात आला होता. ह्या सर्व पार्श्वभूमीवर नुरी ह्यांनी केलेले विधान लक्ष वेधक ठरत आहे.
चेन्नई ते जगातील सर्वात मोठ्या कंपनीच्या सीईओ हा त्यांचा प्रवास जगातील सर्व महिलांसाठी एक प्रेरणादायी प्रवास आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App