मुलींच्या शाळा कधी सुरू होणार? अफगाण मुली शाळा सुरू होण्याची वाट पाहताहेत


विशेष प्रतिनिधी

काबुल : अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट येऊन आता बरेच आठवडे निघून गेले आहेत. सत्तेत आल्यानंतर तालिबानने घोषणा केली होती की, महिलांना त्यांचे पूर्ण स्वातंत्र्य आणि शिक्षणाचा अधिकार देण्यात येईल. या वक्तव्यानंतर मुलांच्या शाळा चालू झाल्या आहेत मात्र मुलींच्या शाळा कधी चालू होतील याबाबत प्रश्नचिन्ह अजून आहे तसेच आहे.

When school will open? Afghan girls are waiting for schools to reopen

काबूल मधील शाळेत जाणारी मारवा हिने एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना म्हणते आहे, ‘मला शाळेत जाऊन शिकून मोठे डॉक्टर व्हायचे होते आणि आपल्या देशाची सेवा करायची होती.’ सोबत मारवाने तालिबान सरकारला लवकरात लवकर आमची शाळा चालू करावी अशी विनंतीही केली आहे.


अफगाणिस्तानात तालिबानचा भर रस्त्यात उच्छाद, गोळीबाराच्या भितीने नागरिक धास्तावले


तालिबानचे प्रवक्ते झबिहुल्लाह मुजाहिद यांनी म्हटले आहे की, अफगाणिस्तानमध्ये पुन्हा कायदा आणि सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी त्यांना जगाकडून आर्थिक मदतीची गरज आहेच. मुलींची शाळा सुरू करण्याचा निर्णय सध्या लांबणीवर पडला आहे. तसेच मुलींना शिकवण्यासाठी महिला शिक्षिका असाव्यात की नसाव्यात या मुद्द्यावरही मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन काम करत आहेत.

संयुक्त राष्ट्र संघाचे मानवाधिकार प्रमुख मिशेल बॅचलेट आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसूफने मात्र अफगाणिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. मागील 20 वर्षांमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी केलेले सर्व प्रयत्न आता धोक्यात येण्याची शक्यता आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

2001 च्या तालिबान राजवटीमध्ये पुरुषाच्या सोबती शिवाय  महिलांना एकट्याने बाहेरदेखील जाता येत नव्हते. तर शाळेतही जाणे मुलींसाठी दुरापास्त होते. या सर्व परिस्थितीवर आपले मत व्यक्त करताना काबूलमधील 57 वर्षीय गणिताच्या शिक्षिका शोमा सहीम म्हणतात, तालिबान सरकार आता स्थिर व्हावे आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने मुलींच्या शाळा सुरू होण्याची गरज ओळखून लवकरात लवकर प्रयत्न करावेत.

When school will open? Afghan girls are waiting for schools to reopen

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी