DRUGS CASE: सर्वसाधारण कुटूंब-लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली ; घरही किरायाचं ; 21 हजार कोटींच गुजरात ड्रग्ज कनेक्शन-तपास अधिकारीही चक्रावले


  • गुजरातच्या मुंद्रा बंदरात 21 हजार कोटी रुपयांचं ड्रग्ज प्रकरण

विशेष प्रतिनिधी

चेन्नई : गुजरातच्या मुंद्रा बंदरात ज्यावेळेस 21 हजार कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं .त्यावेळेस फक्त तपास यंत्रणाच नाही तर सामान्य माणसालाही हादरा बसला. जवळपास 3 हजार किलोची हेरोईन नेमकी कुठून कुठे जात होती आणि त्याचे माफिया नेमके कोण याचा शोध घ्यायला सुरुवात झाली. मात्र या प्रकारणात धक्कादायक खुलासा समोर आले आहे. कच्छमध्ये जप्त करण्यात आलेल्या ह्या ड्रग्जच्या मागे एक साधारण मिडल क्लास कुटूंब आहे. तपास अधिकाऱ्यांनी चेन्नईतल्या एका दाम्पत्याला अटक देखील केली .DRUGS CASE: job lost in lockdown ; House on rent; 21,000 crore Gujarat drug connection with middle class family

हे सगळं उघड झाल्यानंतर त्या दाम्पत्यांच्या शेजाऱ्यांना अजूनही विश्वास बसत नाहीय की, जगातला सर्वात मोठा हेरोईनचा साठा जप्त केला, त्याच्याशी आपल्या ह्या किरायाच्या घरात राहणाऱ्या शेजाऱ्यांचं संबंध असेल. पण हे वास्तव आता समोर आलंय.

कोण आहेत ते दाम्पत्य?

इंडियन एक्स्प्रेसनं याबाबतचं वृत्त दिलेलं आहे. त्यांच्या बातमीनुसार- तपास यंत्रणांनी अटक केलेल्या दाम्पत्याचं नाव आहे मचावरण सुधाकर आणि त्याची पत्नी गोविंदराजू दुर्गा पूर्ण वैशाली. ह्या दोघांना दोन मुलंही आहेत आणि ते चेन्नईच्या कोलापक्कम भागातल्या व्हीओसी स्ट्रीटवरच्या गोवर्धन गिरी अपार्टमेंटमध्ये किरायाच्या घरात राहत होते. इंडियन एक्स्प्रेसला शेजाऱ्यांनी सांगितलं-17 सप्टेंबरला सुधाकर आणि वैशाली यांच्याकडे अनेक पाहुणे आल्याचं दिसत होतं. आता पाहुणे येणं हे काही फार मोठी गोष्ट नाही. पण नंतर लक्षात आलं की हे नेहमीचे साधारण पाहुणे नसून यांचं कनेक्शन हे 21 हजार कोटीच्या हेरोईन जप्तीशी आहे.

लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली

सुधाकर आणि त्याच्या पत्नीबद्दल जी माहिती तपास यंत्रणांना मिळालीय, त्यामुळे तेही चक्रावून गेलेत. कारण मागच्या लॉकडाऊनमध्ये सुधाकरची नोकरी गेली. त्याच काळात त्यानं आशा ट्रेडिंग कंपनी सुरु केली. डीआरआयच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सुधाकरणं गेल्या वर्षी पत्नीच्या नावावर ही कंपनी सुरु केली होती. आशा ट्रेडिंग कंपनी ही आंध्र प्रदेशातल्या विजयवाडामध्ये नोंदणीकृत आहे आणि विशेष म्हणजे ती सुधाकरणं सासूच्या पत्त्यावर नोंदवलीय.

ज्या कंपनीनं हे ड्रग कंटेनर आयात केलेले होते, तिचं नाव आशा ट्रेडिंग कंपनी. आणि याच कंपनीचे मालक आहे एम. सुधाकर आणि जी. दुर्गा पूर्णा वैशाली. हे दोघेही जण गेल्या 6 वर्षापासून किरायाच्या फ्लॅटमध्ये राहत असल्याचं उघड झालंय, ज्याचा किराया फक्त 10 हजार रुपये आहे. म्हणजेच 21 हजार कोटी रुपयांच्या ड्रग्ज कनेक्शनमध्ये 10 हजार रुपयांच्या किरायाच्या घरात राहणारा असल्याचं उघड होतं. अर्थातच यात फक्त हे दाम्पत्यच असेल असं नाही. पण ते ड्रग्जच्या काळ्याबाजाराशी संबंधीत आहेत. तपास यंत्रणांनी दोघांनाही अटक केलीय.

 

DRUGS CASE: job lost in lockdown ; House on rent; 21,000 crore Gujarat drug connection with middle class family

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात