अमेरिका लागले चीनच्या मागे, वुहानच्या कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय अहवाल जाहीर करण्याची मागणी


वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा उगम हा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण २०१९ मध्ये आढळला. त्याच्या एक महिना आधी चीनमधील वुहान येथील विषाणूशास्त्र प्रयोगशाळेतील संशोधक गंभीर आजारी असल्याचे उघडकीस आले असून अमेरिकेतील गुप्तचर संघटना त्याचा कसून तपास करीत आहेत. आता वुहानमधील प्रयोगशाळेतील नऊ कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय अहवाल जाहीर करण्याचे आवाहन अमेरिकेतील संसर्गजन्य रोगतज्ज्ञ अँथनी फौसी यांनी चीनला केले. USA targets China in terms coronaयामुळे कोरोनाचा उगम प्रयोगशाळेतून झाला का?, याच्या तपासात महत्त्वाचे धागेदोरे मिळू शकतील. माणसात प्रथम कोरोनाचा शिरकाव प्राण्यांमधून झाला असल्याचा ठाम विश्वा स फौसी व्यक्त करीत आहेत. ‘‘वुहानमधील प्रयोगशाळेत काम करणारे तीन कर्मचारी २०१९ मध्ये आजारी पडले होते, त्यांचे वैद्यकीय अहवाल मला पाहायचे आहेत. ते खरेच आजारी होते का?, आणि ते खरेच आजारी असतील तर त्यामागील कारण, तपासायचे आहे,’’ असे फौसी म्हणाल्याचे या एका वृत्तात नमूद केले आहे.

USA targets China in terms corona

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण