उजाड गावे वसविण्यासाठी अनोखी शक्कल, घराची किंमत केवळ ८७ रुपये

विशेष प्रतिनिधी

रोम : उजाड होत असलेली गावे वसविण्यासाठी आता इटलीतील लॅटिअर प्रदेशात अनोखी शक्कल लढविली जात आहे. इटलीतील मेनेझा शहरात केवळ ८७ रुपये म्हणजे एक युरो किंमतीमध्ये घरांची विक्री सुरू झाली आहे. पर्यटनव्यवसाय वाढविण्यासाठीही याचा उपयोग होणार आहे.Unique shackles for setting up desert villages, the price of a house is only Rs 87

या गावातील पहिल्या काही घरांच्या विक्रीसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत २८ ऑगस्ट आहे. त्यानंतर लकवरच आणखी घरे ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहेत. पहिल्या काही घरांच्या विक्रीसाठी 28 ऑगस्ट रोजी अर्ज बंद होतील, आणखी घरे लवकरच खरेदीदारांसाठी उपलब्ध केली जातील. पुढील काळात रिकाम्या पडलेल्या झोपड्याही विक्रीसाठी ठेवल्या जाणार आहेत.मेनेझाचे महापौर क्लॉडिओ स्परदुती यांनी सीएनएनला माहिती देताना आम्ही एक नवे पाऊल टाकले आहे. त्यामुळे या परिसरातील मुळ कुटुंबे संपर्कात येतील. त्यांनी आपली जुनी घरे आमच्याकडे सोपवावीत यासाठी वेबसाईटवर लिलाव करण्यात येणार आहे.

रोमपासून सुमारे ७० किलोमीटर असलेल्या या शहराच्या मध्यभागी मध्ययुगीन पध्दतीचे बांधकाम आहे. घरे विकत घेणाºया खरेदीदाराला तीन वर्षांच्या अनामत रक्कम म्हणून पाच हजार युरो द्यावे लागतील. घरांचे नुतनीकरण पूर्ण झाल्यावर त्यांची ही ठेव परत केली जाणार आहे. घर, रेस्टॉरंट किंवा दुकान म्हणून ही मालमत्ता कशी वापरायची आहे याची सविस्तर योजना खरेदीदाराला सादर करावी लागेल.

Unique shackles for setting up desert villages, the price of a house is only Rs 87

महत्त्वाच्या बातम्या