धक्कादायक, हवेत गोळीबार करत मगरींना खाऊ घालण्याची धमकी, उद्योजक नाना गायकवाडसह मुलावर गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी

पुणे : उद्योजक नाना गायकवाड याच्यासह त्याच्या मुलावर सांगवी पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला. व्याजाने दिलेल्या पैशांच्या कारणावरून गॅरेज चालकाला फार्म हाऊसवर नेले. पिस्तुलाचा धाक दाखवून ठार मारून मगरीला खाऊ घालण्याची धमकी दिली. तसेच गॅरेजमधून तीन महागड्या चारचाकी आणि साहित्य, असे २५ लाख ६० हजारांचे साहित्य जबरदस्तीने नेले. विशालनगर, पिंपळे निलख येथे जानेवारी ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीत ही घटना घडली.Shocking, threatening to feed crocodiles by firing in the air, charges filed against businessman Nana Gaikwad and his son

नानासाहेब शंकरराव गायकवाड, गणेश नानासाहेब गायकवाड (दोघे रा. औंध), राजाभाऊ अंकुश, ॲड. नाणेकर, अशी आरोपींची नावे आहेत. गॅरेज चालक विठ्ठल शिवानंद गुरव यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. २३) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने विशालनगर, पिंपळे निलख येथे सुरू केलेल्या कार हब या गॅरेजसाठी त्यांनी आरोपी गायकवाडकडून कर्ज घेतले. आरोपी ॲड. नाणेकर याने व्यवहाराची ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी केली. त्यातील मजकूर वाचायला न देता त्यावर फिर्यादीची सही घेतली.

फिर्यादीने कर्जाची काही रक्कम दिली. मात्र व्याज थकल्याने सूस, पुणे येथील आरोपीच्या फार्म हाऊसवर फिर्यादीला नेले. तेथे जीवे ठार मारण्याची धमकी देऊन आरोपींनी पिस्तुलातून हवेत तीनवेळा गोळीबार केला. त्यानंतर सुमारे १५ दिवसांनी फिर्यादी यांच्या गॅरेजवर येऊन आरोपी राजाभाऊने फिर्यादीला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

तसेच गॅरेजमधून २५ लाख ६० हजारांचे गॅरेजचे साहित्य व मशीनरी तसेच गॅरेजमधील तीन चारचाकी वाहने जबरदस्तीने नेले. ठार मारून फार्म हाऊसवरील विहिरीत असलेल्या मगरींना खाऊ घालण्याची धमकी आरोपीने दिली.आरोपी नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. अन्य आरोपींच्या मागावर पोलीस पथके रवाना झाली आहेत.

Shocking, threatening to feed crocodiles by firing in the air, charges filed against businessman Nana Gaikwad and his son

महत्त्वाच्या बातम्या