ओमायक्रॉन व्हेरियंटने इंग्लंडमध्ये एका दिवसांत 88 हजार कोरोना रूग्ण.फ्रान्समध्येही कोरोना रूग्णसंख्येत कमालीची वाढ
वृत्तसंस्था
लंडन :युरोपात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने इंग्लंडमध्ये कहर केला आहे. इंग्लंडमध्ये एका दिवसांत तब्बल 88 हजार रूग्ण आढळले आहेत. जानेवारीनंतरची ही सर्वात मोठी रुग्णवाढ आहे. U K reports more than 88,000 daily COVID-19 cases, a new record amid Omicron variant concerns
डेल्टानंतर ओमायक्रोनने शिरकाव केल्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे.इंग्लंडमध्ये यापूर्वी बुधवारी 65 हजार 713 कोरोनाग्रस्त आढळले होते. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1 कोटी 10 लाखांच्या पुढे गेली आहे.
फ्रान्समध्येही काल एका दिवसांत तब्बल 60 हजार रूग्ण आढळले आहेत.ओमायक्रोनचा शिरकाव आणि आता त्यातच ख्रिसमस आणि नवीन वर्ष सेलिब्रेशनची तयारी सुरू झाल्यामुळे इंग्लंड, फ्रान्समध्ये कोरोना संसर्गाची आणखी भयानक स्थिती येऊ शकते.
कोरोनाचा धोका लक्षात घेता युरोप लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र, वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App