ट्रम्प यांना चिंता हजारो दहशतवादी जगभर पसरण्याची तर रशियाला चिंता तालिबानकडील शस्त्रसाठ्याची


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन प्रशासनाच्या अफगाणिस्तानबाबतच्या धोरणावर जोरदार टीका केली. अफगाणींना विमानाने देशाबाहेर नेण्याच्या योजनेद्वारे हजारो दहशतवादी जगभर पसरतील, अशी शंका ट्रम्प यांनी व्यक्त केली. Trump and Russia both worries about taliban

‘बायडेन यांनी अफगाणिस्तानाल दहशतवाद्यांच्या हातात सोपवत तिथे असलेल्या हजारो अमेरिकी नागरिकांना मरणाच्या दारात सोडले आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानातून बाहेर काढलेल्या २६ हजार नागरिकांपैकी केवळ चारच हजार अमेरिकी नागरिक होते. सर्व परिस्थितीवर नियंत्रण असलेल्या तालिबानने निश्चिीतच या विमानांमधून दहशतवादी बाहेर पाठविले असणार. ही फार भयानक परिस्थिती आहे,’ असे ट्रम्प आज म्हणाले.



दरम्यान, तालिबानच्या हातात मोठा शस्त्रसाठा असल्याबद्दल रशिया सरकारने चिंता व्यक्त केली आहे. अफगाणिस्तानचा ताबा मिळविलेल्या तालिबानच्या हाती येथील सरकारकडील मोठा शस्त्रसाठा लागला असून त्यात हवाई हल्ल्यांपासून संरक्षण देणाऱ्या यंत्रणेचाही समावेश आहे. याशिवाय, अनेक युद्धवाहने, लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरही त्यांच्या ताब्यात आहेत. त्यांच्याकडील प्रचंड शस्त्रसाठा ही चिंतेची बाब आहे. तालिबानने देशातील सर्व घटकांचा समावेश असलेल्या सरकारची स्थापना करावी आणि शांतता प्रस्थापित करावी, अशी अपेक्षाही रशियाने व्यक्त केली आहे.

Trump and Russia both worries about taliban

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात