भारताला मदत करायला तयार पण स्वत:च्या देशातील परिस्थिती सुधरेना, कोरोना नियमावली पाळण्यासाठी पाकिस्तानच्या १६ शहरांत लष्कर तैनात


भारतातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून पाकिस्तानने भारताला मदतीची तयारी दर्शविली आहे. परंतु, खुद्द पाकिस्तानला आपल्या देशातील परिस्थिती सुधारणे अवघड झाले आहे. त्यामुळे १६ शहरांमध्ये लष्कर तैनात करण्याची वेळ आली आहे.Troops deployed in 16 Pakistani cities to comply with Corona rules


विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद : भारतातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून पाकिस्तानने भारताला मदतीची तयारी दर्शविली आहे. परंतु, खुद्द पाकिस्तानला आपल्या देशातील परिस्थिती सुधारणे अवघड झाले आहे. त्यामुळे १६ शहरांमध्ये लष्कर तैनात करण्याची वेळ आली आहे.

पाकिस्तानातील अनेक भागांत सध्या कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. त्यामुळे देशातील १६ शहरांमध्ये लोकांनी नियम पाळावेत यासाठी लष्कर तैनात करण्यात आले आहे. पाकिस्तानात सध्या रात्रीची संचारबंदी सुरू आहे.लोकांनी मास्क घालण्याच्या नियमाचे पालन करावे तसेच सायंकाळी सहानंतर जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी बाहेर पडू नये यावर लष्कर लक्ष ठेवणार आहे.मेजर जनरल बाबर इफ्तिकार यांनी सांगितले की उद्या सकाळी सहा वाजल्यापासून लष्कर तैनात करण्यात आले आहे.

नागरी सरकारला लष्कराचे जवान मदत करणार आहेत. पाकिस्तानातील आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या दुसºया लाटेमधील सर्वाधिक मृत्यू आज झाले. त्याचबरोबर ५७० नागरिक सध्या व्हेटिंलेटरवर असून ४,३०० जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे हा न् निर्णय घेला आहे.

अनेक शहरांमध्ये ९० टक्यांहून अधिक व्हेटिंलेटर वापरात आहेत. त्याचबरोबर देशातील सर्व ऑक्सिजन प्लॅटना वैद्यकीय उपयोगासाठीचा ऑक्सिजन तयार करण्यास सांगण्यात आले आहे.

कोरोना महामारीविरुध्द लढण्याची मुख्य जबाबदारी ही नागरी शासनाची आहे. त्यांना मदत करण्यसााठी लष्कर तैनात करण्यात आले आहे. पाकिस्तानात आत्तापर्यंत कोरोनामुले १७,१८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत ८ लाख ४५२ नागरिक कोरोनाबाधित झाले आहेत.

पाकिस्तान सरकारने राष्ट्रव्यापी लॉकडाऊनची शक्यता फेटाळून लावली आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्यांचे जगण अवघड बनते. त्यामुळे लॉकडाऊन लावला जाणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करण्याचेआवाहन केले आहे. लष्कर केवळ नियमांचे पालन करण्यासाठी तैनात करण्यात आलेआहे. अन्यथा पाकिस्तानची अवस्थाही शेजारील भारतासारखीच होईल,

असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, भारताप्रमाणेच पाकिस्तानातही कोरोनाचा कहर वाढला तर शहरांमध्ये लॉकडाऊन लावला जाऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, हे आपण करू इच्छित नाही कारण लॉकडाऊनचा सर्वात फटका गरीबांना बसतो, असेही ते म्हणाले.

Troops deployed in 16 Pakistani cities to comply with Corona rules

 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय