वृत्तसंस्था
अहमदाबाद : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे (WHO) महासंचालक डॉ. टेड्रोस गेब्रेयसस हे सोमवारपासून तीन दिवस गुजरातच्या दौऱ्यावर आहेत, भारताने जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कोरोना विषाणूमुळे मृत्यूची मोजणी करण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतल्यानंतर झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ते गुजरात दौऱ्यावर असतील. The WHO chief will arrive in Gujarat today for three days
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, भारताने याबाबत सदस्य देशांशी आपली चिंता व्यक्त केली आहे. याबाबत WHO ला सहा पत्रेही लिहिली आहेत. नुकत्याच आलेल्या न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार, भारत WHO ला कोरोनामुळे जगभरातील मृत्यूची संख्या सार्वजनिक करण्यापासून रोखत आहे.
अहवालानुसार, भारतात कोरोनामुळे मरण पावलेल्या लोकांचा अधिकृत आकडा ५.२० लाख आहे. तर, WHO च्या अंदाजानुसार, या महामारीमुळे देशात ४०लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हा अहवाल समोर आल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. या आकडेवारीवरून काँग्रेस पक्षाने केंद्रावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या आकडेवारीवरून वाद
कोरोना विषाणूच्या जागतिक महामारीमुळे मृत्यूची गणना करण्याच्या WHO च्या पद्धतीवर भारताने प्रश्न उपस्थित केले आहेत. भारत सरकार म्हणते की विशाल भौगोलिक आकार आणि मोठ्या लोकसंख्येच्या आपल्या देशात मृत्यूचा अंदाज लावण्यासाठी कोणतेही गणितीय मॉडेल वापरणे योग्य असू शकत नाही.
डॉ. टेड्रोस गेब्रेयसस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काही कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गेब्रेयसस १८ एप्रिलला म्हणजे आज राजकोटला पोहोचतील जिथे ते रात्रीचा मुक्काम करणार आहे. मंगळवारी, ते PM मोदींसोबत जामनगरमध्ये WHO च्या ग्लोबल सेंटर ऑन ट्रॅडिशनल मेडिसिन (GCTM) च्या पायाभरणीला उपस्थित राहतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App