शस्त्रे खाली टाकून मागण्या मान्य करा तरच युद्ध थांबेल; पुतीन यांचा पुन्हा एकदा युक्रेनला इशारा


विशेष प्रतिनिधी

मॉस्को : युक्रेनने शस्त्रे खाली टाकावेत व आमच्या मागण्या मान्य कराव्यात. मागण्या मान्य झाल्यानंतरच आम्ही युक्रेनमधून आमचे सैन्य माघारी बोलावू तोपर्यंत युद्ध सुरूच राहील असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनला दिला आहे.The war will end only if we accept the demands by laying down arms; Putin once again warns Ukraine

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाकडून युक्रेनवर मिसाईल हल्ले करण्यात येत आहेत. या युद्धात युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाने युद्ध थाबवावे यासाठी अमेरिकेसह युरोपीयन राष्ट्र रशियावर दबाव निर्माण करत आहेत. मात्र या दबावानंतर देखील रशियाने युक्रेनविरोधात युद्ध सुरूच ठेवले आहे.या सर्व पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनला इशारा दिला आहे. युक्रेनने शस्त्रे खाली टाकावेत व आमच्या मागण्या मान्य कराव्यात. मागण्या मान्य झाल्यानंतरच आम्ही युक्रेनमधून आमचे सैन्य माघारी बोलावू तोपर्यंत युद्ध सुरूच राहील असे पुतीन यांनी म्हटले आहे.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर तुक्रीचे पंतप्रधान तय्यिप एर्दोगन आणि पुतीन यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली. त्याचदरम्यान पुतीन यांनी युक्रेनला इशारा दिला आहे. दरम्यान दुसरीकडे या युद्धात रशियाचे अकरा हजार सैनिक मारल्याचा दावा युक्रेनने केला आहे.

युक्रेनला नाटोचे सदस्तत्व हवे आहे. त्यासाठी युक्रेनकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र युक्रेनच्या या निर्णयाला रशियाने विरोध केला आहे. युक्रेन नाटोचा सदस्य झाल्यास सरक्षीतते विषयी गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे युक्रेनने नाटोचा सदस्य होऊ नये अशी रशियाची मागणी आहे.

मात्र युक्रेन आपल्या मागणीवर ठाम असल्याने अखेर 24 फेब्रुवारीपासून युद्धाला सुरुवात झाली आहे. आज या युद्धाचा अकरावा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनच्या प्रमुख शहरांवर हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यात या शहरांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. रशियाला विरोध करण्यासाठी आता युक्रेनचे सामान्य नागरिक देखील रस्त्यावर उतरले आहेत.

रशियाने युक्रेनवर युद्ध लादले असून, ते थाबवावे अशी मागणी नाटोचे सदस्य असलेल्या अमेरिकेसह अनेक युरोपीयन देशांनी केली आहे. मात्र तरी देखील रशिया युद्ध थांबवण्यास तयार नाहीये. युक्रेनने मागण्या मान्य केल्यानंतरच युद्ध थांबेल अशी भूमिका रशियाने घेतली आहे.

त्यामुळे आता रशियावर दबाव निर्माण करण्यासाठी आर्थिक निर्बंध घालण्यात आले आहेत. अमेरिकेसह युरोपीयन राष्ट्रांनी रशियावर आर्थिक निर्बंध घालते आहेत. याचा मोठा फटका हा जागतिक बाजारपेठेला बसत असल्याचे दिसून येत आहे.

The war will end only if we accept the demands by laying down arms; Putin once again warns Ukraine

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण