भारतासह सगळ्याच देशांसोबत चांगले संबंध निर्माण करायचेय, तालीबान सरकारने पाकिस्तानला सुनावले


विशेष प्रतिनिधी

काबूल : आपल्याला भारतासह क्षेत्रातील इतर सगळ्याच देशांसोबत चांगले संबंध निर्माण करायचे आहेत. एका देशाच्या सांगण्यावरून आपण आपले दुसºया देशासोबत असलेले संबंध बिघडवणार नाहीत, अशा स्पष्ट शब्दांत अफगणिस्थानातील तालीबान सरकारने पाकिस्तानला सुनावले.The Taliban government has told Pakistan that it wants to build good relations with all countries, including India

पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफ यांनी नुकताच एक अफगाण दौरा केला. या दौऱ्यात मोईद युसूफ यांना तालिबानकडून भारतासोबतच्या संबंधांबद्दल स्पष्ट संदेश देण्यात आला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी आपल्या अफगाणिस्तान दौऱ्यापूर्वी पाकिस्तानमध्ये टीटीपीला प्रोत्साहन दिल्याचे निराधार आरोप भारतावर केले होते.



अफगाणिस्तानला पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांशी चांगले संबंध निर्माण करायचे आहेत. पाकिस्तानच्या विनंतीवरून तालिबान भारताशी कधीही वाकड्यात शिरणार नाही, असे तालिबान सरकारचे प्रवक्ते, उप माहिती आणि सांस्कृतिक मंत्री जबिउल्ला मुजाहिद यांनी म्हटले आहे.

शेजारी देशांशी संबंध सुधारण्याची हीच वेळ असल्याचे सांगत तालिबानची भूमिका मुजाहिद यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले, दुष्प्रचारामुळे आणि अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे भूतकाळात पाकिस्तानशी चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकले नाहीत.

तालिबान सरकारने ड्युरंड रेषेवरील गोष्टी सुरळीत करण्यासाठी पाकिस्तानशी समन्वय साधण्यास सहमती दर्शविल्याचे यापूर्वी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते. काही दिवसांपूर्वी ड्युरंड रेषेवर पाकिस्तान – अफगाणिस्तान अशा दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती.

त्यामुळे या दोन देशांत बराच तणावही निर्माण झाला होता. हा तणाव कमी करण्यासाठी आणि तालिबानचे मन वळवण्यासाठी पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अफगाणिस्तानचा दौरा केल्याचे म्हटले जात आहे.अफगाणिस्तानातील सत्तेवर तालिबाननं वर्चस्व मिळवल्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता

भारतानं अफगाणिस्तानातील सामान्य जनतेला मदतीचा हात देऊ केला आहे. भारतानं काबूलमध्ये असलेल्या लहान मुलांच्या रुग्णालयात औषधं धाडण्यासोबतच हजारो टन गहू पाठवण्याचा निर्णय घेतलाय. हा गहू पाकिस्तानमार्गे काबूलला पोहचणार आहे. भारतानं २०२२ च्या अर्थसंकल्पात अफगाणिस्तानसाठी २०० कोटींची तरतूद केली आहे.

The Taliban government has told Pakistan that it wants to build good relations with all countries, including India

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात