विशेष प्रतिनिधी
काबूल : मैत्रीचे प्रतिक म्हणनू सहा वर्षांपूर्वी भारताने इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तानला नव्याने बांधलेली संसदेची इमारत भेट दिली होती. अफगाणिस्तान सरकार कोसळल्यानंतर तालिबानी बंडखोर बंदुका घेऊन घुसले. The Taliban entered the Indian-built parliament with guns
सोमवारी काबूलमधील संसदेच्या इमारतीमध्ये तालीबानी घुसले. राष्ट्रपती भवनावर हल्ला करून अफगाणिस्तान पूर्ण ताब्यात घेण्याची घोषणा केल्यानंतर त्यांनी संसदेवरही हल्ला केला. भारताने गेल्या दोन दशकांमध्ये अफगाणिस्तानमध्ये जवळपास 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. अफगाणिस्तानातल्या पायाभूत सेवा क्षेत्राच्या उभारणीत आणि संस्थांच्या पुनर्उभारणीमध्ये भारताने आतापर्यंत तीन अब्ज डॉलर्सपेक्षा जास्तीची गुंतवणूक केल्याचा अंदाज आहे.
अफगाणिस्तानाची संसद भारताने बांधली आहे आणि अफगाणिस्तानसोबत एक मोठा बंधाराही बांधला आहे. शिक्षण आणि तांत्रिक सहाय्यही भारताने अफगाणिस्तानाला पुरवलं आहे. सोबतच भारताने अफगाणिस्तानातल्या नैसर्गिक साधनसंपत्तीमध्येही गुंतवणूक करण्यासही प्रोत्साहन दिले आहे.
तालिबान ज्याप्रकारे अफगाणिस्तानात हिंसाचार करतंय ते पाहता, त्यांनी सत्ता काबीज केल्या ते किती वैध असेल याविषयी भारताने सवाल केला आहे. पाकिस्तान विरुद्ध आपल्याकडे असणारी युद्धात्मक आघाडी तालिबान आल्यास जाईल, ही भारताची सगळ्यात मोठी चिंता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App