THE RIGHT PERSON AT THE RIGHT TIME : भारतीय वंशाच्या अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या फर्स्ट डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर


  • गीता गोपीनाथ 21 जानेवारीला IMF च्या फर्स्ट डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर या पदाचा कार्यभार स्वीकारणार .
  • जियोफ्रे ओकामोटो यांच्या जागी भारतीय वंशाच्या अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांची निवड .

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय नाणे निधी म्हणजे IMF इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (International Monetary Fund) च्या फर्स्ट डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर जियोफ्रे ओकामोटो या पुढील वर्षी राजीनामा देणार आहेत.THE RIGHT PERSON AT THE RIGHT TIME: Indian-origin economist Geeta Gopinath is the First Deputy Managing Director of the International Monetary Fund.

ओकामोटो यांच्या जागी भारतीय वंशाच्या अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांची निवड करण्यात आली आहे. गीता गोपीनाथ 21 जानेवारीला फर्स्ट डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.



गीता गोपीनाथ यांचा जन्म भारतात झाला आहे मात्र त्या अमेरिकेच्या नागरिक आहेत.

गीता गोपीनाथ सध्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

गीता गोपीनाथ यांचे संशोधन लेख मूर्धन्य इकॉनॉमिक्स जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत.

आयएमएफमध्ये मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम करण्याअगोदर गीता गोपीनाथ या हॉवर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागातील आंतरराष्ट्रीय स्टडीज अँड इकॉनॉमिक्सच्या प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या.

 


गीता गोपीनाथ यांची ऑक्टोबर 2018 मध्ये चीफ इकॉनॉमिस्ट म्हणून आयएमएफमध्ये निवड झाली होती.

त्या जानेवारी 2022 मध्ये हॉवर्ड विद्यापीठात पुन्हा काम करण्यासाठी जाणार होत्या.

ओकामोटो जानेवारीमध्ये त्यांच्या पदावरुन राजीनामा देणार आहेत.

आयएमफच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांची निवड.

गीता गोपीनाथ यांनी त्यांच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून असलेल्या कार्यकाळात महत्वाची भूमिका पार पाडली आहे.

पॅनडेमिक पेपरमध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे.

संपूर्ण जगभरातील कोरोना विषाणू संसर्ग समाप्त करण्यासाठी काय करावं लागेल यासंबंधी त्यांनी मांडणी केली. जगभरात लसीकरण करण्याचं ठरवण्यात आलं. त्यानुसार आयएमएफ, जागतिक बँक आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या नेतृत्त्वात मल्टीलॅटरल टास्क फोर्स स्थापन करण्यात आला होता.

THE RIGHT PERSON AT THE RIGHT TIME: Indian-origin economist Geeta Gopinath is the First Deputy Managing Director of the International Monetary Fund.

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात