हा केवळ मोदींसाठीच नव्हे तर प्रत्येक भारतीयासाठी तो अभिमानस्पद क्षण होता.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी रविवारी (21 मे) पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले. FIPIC परिषदेत सहभागी होण्यासाठी मोदी पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले आहेत. जेथे त्यांचे पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी स्वागत केले. याप्रसंगी पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांचे सर्वासमक्ष चरण स्पर्श केले. The Prime Minister of Papua New Guinea, one of the worlds largest island countries touched the feet of PM Modi
इतिहासात असे कधीच घडले नाही. जगातील सर्वात मोठ्या बेट देशांपैकी एक असलेल्या पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान मोदींच्या चरणांना स्पर्श केला. सर्व प्रोटोकॉल तोडून ते मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर पोहोचले होते. खरंतर त्या देशात रात्रीच्या वेळी राजकीय सन्मानाची परंपरा नाही. पापुआ न्यू गिनी हा जगातील सर्वात वैविध्यपूर्ण देश आहे ज्यामध्ये अंदाजे ७०० भाषा बोलल्या जातात. हा मोदींचा सन्मान नाही, हा देशातील प्रत्येक नागरिकाचा सन्मान आहे.
https://youtube.com/shorts/xlDuUAHLn2A?feature=share
पापुआ न्यू गिनी येथील मोरेस्बी (जॅक्सन) आंतरराष्ट्रीय विमानतळावर पंतप्रधान मोदींचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने अनिवासी भारतीय उपस्थित होते. पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला. पंतप्रधान मोदी 22 मे रोजी पापुआ न्यू गिनी येथे भारत-पॅसिफिक द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या (FIPIC) तिसऱ्या शिखर संमेलनास उपस्थित राहतील.
तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात मोदी पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले आहेत. कोणत्याही भारतीय पंतप्रधानांची पापुआ न्यू गिनीला ही पहिलीच भेट आहे. पंतप्रधानांचे जपानहून येथे आगमन झाले. तिथे त्यांनी G-7 शिखर परिषदेत भाग घेतला आणि अनेक जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या. FIPIC ची स्थापना 2014 मध्ये पंतप्रधान मोदींच्या फिजी दौऱ्यादरम्यान झाली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App