ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या शिगेला, तिसऱ्या लाटेचा धोका


विशेष प्रतिनिधी

लंडन – ब्रिटनमध्ये सारे काही सुरळीत होण्याची चिन्हे दिसू लागली असतानाच कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे सर्वांचे धाबे दणाणले असून देशात तिसऱ्या लाटेची चर्चा सुरु झाली आहे. The number of corona patients in Britain has skyrocketed, threatening a third wave

देशात काल ७५४० नवीन रुग्ण आढळले. गेल्या चार महिन्यात प्रथ्मच इतके रुग्ण देशात आढळले आहेत. त्यामुळे ब्रिटनमध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे.



देशभरात एक आठवड्यापासून सलग ५५०० पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. गेल्यावर्षीच्या ख्रिसमसनंतर प्रथमच सध्या एवढ्या मोठ्या संख्येने सलग रुग्ण वाढत असून ते प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

मात्र मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्याने रुग्ण जरी वाढत असले तरी ब्रिटनला धोका नसल्याचे काहींचे म्हणणे आहे. संपूर्ण देशात कोरोनामुळे काल सहा जणांचा मृत्यू झाला तर २२३४ जण बरे झाले. ब्रिटनमध्ये आतापर्यंत ४५.३ लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत १.२८ लाख जणांचा मृत्यू झाला आहे.

The number of corona patients in Britain has skyrocketed, threatening a third wave

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात