विशेष प्रतिनिधी
अफगाणिस्तान : अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार आले आहे. अफगाणिस्तान मधील ज्या लोकांना तालिबान राजवटीचा इतिहास माहीत आहे, त्या अफगान नागरिकांनी देशाबाहेर स्थलांतरित होण्यासाठी 19 ऑगस्ट 2021 रोजी काबुली विमानतळावर गर्दी केली होती. अफगाणिस्तानामधील प्रत्येक जण देशा बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते.
That baby, taken by the US military from a star fence, is missing
त्यावेळचे काबुल विमानतळा वरील बरेच फोटो तुम्ही पाहिले असतील. पण या गर्दीमध्ये एका फोटोने मात्र जगाचं लक्ष वेधलं होतं. दोन महिण्याच्या आपल्या लहान मुलाला गर्दीतून वाचण्यासाठी तारेच्या कुंपणावरून विमानतळावर घेण्यासाठी अमेरिकन सैनिक मदत करत असल्याचा हा फोटो होता. अशा बऱ्याच मुलांना विमानतळावर घेण्यासाठी सैनिकांनी मदत केली होती. ह्या सर्व मुलांना विमानतळा वरील एका स्पेशल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. पण यातील मुलांपैकी काही मुले बेपत्ता झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
AFGANISTAN : तालिबानची कथनी एक करनी एक : शांततेचे आश्वासन देऊन तालिबानचा काबूल विमानतळावर महिला आणि मुलांवर हल्ला
मिर्झा अली अहमदी आणि त्यांची पत्नी सुरय्या हे त्या बेपत्ता झालेल्या 2 महिन्याच्या मुलाचे पालक आहेत. 19 ऑगस्ट 2021 रोजी आपल्या पाच मुलांसह काबूल विमानतळाच्या बाहेर आले होते. मात्र प्रत्येकजण तालिबानच्या भीतीने अफगान सोडण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे विमानतळावर प्रचंड गर्दी झाली होती. सुरक्षा भिंतीवरील तारेचे कुंपण पार करून विमानतळावर प्रवेश करण्याचा सर्वजणच प्रयत्न करत होते. गर्दी इतकी वाढली की चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झालेली होती. अशावेळी मिर्झा अली अहमद यांनी आपल्या दोन महिन्याच्या बाळाचा प्राण वाचवण्यासाठी कुंपणाच्या दुसर्या बाजूला असलेल्या सैन्याकडे बाळ सोपवले होते.
हा फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला होता. हा फोटो पाहून डोळ्यात पाणी आल्यापासून राहत नव्हते. काळजाचा ठोका चुकवणारा हा फोटो बऱ्याच लोकांचे मन हेलावून टाकणारा फोटो होता. पण कमांडरसोबत चौकशी केल्यानंतर हे बाळाचा काहीही थांगपत्ता लागला नाही. तीन दिवस त्यांनी बाळाचा शोध घेतला आणि पुढे ते कतार नंतर जर्मनी मार्गे अमेरिकेमधील स्थलांतरित लोकांच्या छावणीमध्ये राहायला गेले आहेत. त्या बाळाचा आजतागायत काहीही पत्ता नाहीये. इतके दिवस होऊनही बाळ सापडले नसल्याने पीडित कुटुंब प्रचंड काळजी मध्ये आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App