महिलांना नखशिखांत बुरखा घालणे बंधनकारक, तालिबानचा नवा फतवा

विशेष प्रतिनिधी

काबूल – अफगाणिस्तानात तालिबानने ताबा मिळवल्यानंतर महिनाभरापासून राजकीय अस्थैर्याचे वातावरण असताना महाविद्यालय आणि विद्यापीठाचे वर्ग सुरू झाले आहेत. मुलींना शिक्षणाची परवानगी दिली असली तरी कडक निर्बंध घातले आहेत. बहुतांश विद्यापीठात महिला शिक्षक असून नसल्यासारखे आहेत. नखशिखांत बुरखा घालणाऱ्या विद्यार्थिनींनाच महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार आहे. Taliban issues fatwa for womens

मुले आणि मुली एकत्र असतील तर वर्गात पडदा लावण्याचे बंधन घालण्यात आले आहे. अफगाणिस्तानात तालिबानची राजवट येण्यापूर्वीच महिलांना बुरखा घालूनच रस्त्यावर यावे लागत होते. आता तालिबानने सत्ता मिळवल्यानंतर जवळपास सर्वच महिलांना बुरखा अनिवार्य केला आहे. चेहऱ्याचा अधिकाधिक भाग झाकला जाईल, अशा रीतीने बुरखा घालावा, असे तालिबानने बजावले आहे.


 माजी परराष्ट्र मंत्री यशवंत सिन्हा – भारताने तालिबान सरकारसोबत काम करू नये


मुले आणि मुली हे एकाच वर्गात बसून शिक्षण घेण्यास मनाई करण्यात आली आहे. महाविद्यालय आणि विद्यापीठात मुले आणि मुलींसाठी वेगळे वर्ग असतील. मुलींना केवळ महिला प्राध्यापिका मुलींना शिकवतील आणि त्यामुळे महिला शिक्षकांची भरती केली जाणार आहे. महिला प्राध्यापिका न मिळाल्यास ज्येष्ठ पुरुष शिक्षक मुलींना शिकवू शकेल.

परंतु त्याचे वर्तन चांगले असणे गरजेचे असल्याचे तालिबानने म्हटले आहे. २००१ नंतर स्थापन झालेल्या महाविद्यालयांना तालिबानचा आदेश लागू राहणार आहे. शिकवणाऱ्या महिलेने आपला चेहरा संपूर्णपणे झाकावा असे म्हटले आहे.

Taliban issues fatwa for womens

महत्त्वाच्या बातम्या