काबूल – तालिबानने देश ताब्यात घेतल्यानंतर अफगाणी महिलांचे आयुष्य १८० अंशाने बदलले आहे. प्रत्येक घराची झडती घेत तालिबानी लग्नासाठी महिला व १५ वर्षांवरील मुलींचा शोध घेत आहेत, असे तालिबानच्या तावडीतून सुटलेल्या पत्रकार होली मॅकके यांनी म्हटले आहे. Taliban giving pressure on Afghani women’s future
त्यांनी म्हटले आहे की, काबूल जिंकल्यानंतर तालिबानी देशभरातील प्रत्येक घराची झडती घेत आहेत. त्यांना लग्नासाठी महिला व १५ वर्षांवरील मुली हव्या आहेत. अफगाणिस्तानमधील महिलांनी त्यांच्या स्वातंत्र्यासाठी प्रदीर्घ लढा द्यावा लागला आहे. तालिबानने या देशावर कब्जा मिळविल्यानंतर त्यांचे जीवन एका क्षणात बंदिस्त झाले.
मॅकके यांनी गेल्या आठवड्यात काबूलजवळील विस्थापितांच्या छावणीत १४ वर्षांच्या मुलीची भेट घेतली होती. कंदुसमधील लढाईत तिला जीव वाचविण्यासाठी पळावे लागले होते. शिकून डॉक्टर होण्याची तिचे स्वप्न आहे.
तालिबान्यांनी अफगाणी महिलांवर जाचक निर्बंध तर लादले आहेच शिवाय लग्नासाठी मुलींचे अपहरणही करून लैंगिक शोषणही करण्यात येत आहे. यासाठी बडकशानमधील एक उदाहरण मॅकफे यांनी दिले आहे. हा शहराचा ताबा तालिबानने काही महिन्यांपूर्वीच घेतला आहे.
तेथील २१ वर्षांच्या युवतीला घरातून नेण्यात आले. तालिबानी दहशतवाद्याने तिच्याशी लग्न केले. ज्या तालिबान्याने तिच्याशी लग्न केले, तो तिच्याशी लैंगिक संबंध ठेवायचाच, शिवाय चार तालिबानी दररोजरात्री तिच्यावर बलात्कार करतात, हे तिच्या वडिलांना समजले. या हतबल वडिलांचे गाऱ्हाणे ऐकूनही जिल्ह्याच्या गव्हर्नरनेही कारवाई करण्यास असमर्थता दर्शविली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App