तालिबान सरकारने निदर्शनावरही घातली बंदी! घोषणा देण्यापूर्वी  घ्यावी लागणार परवानगी

तालिबान सरकारच्या गृहमंत्रालयाने निषेधासंदर्भात नवीन नियम बनवले आहेत, ज्याअंतर्गत कोणत्याही आंदोलनाची माहिती 24 तास अगोदर द्यावी लागेल. Taliban bans protests  Permission must be obtained before making an announcement


विशेष प्रतिनिधी

काबूल : अफगाणिस्तानात तालिबानचे सरकार स्थापन झाले आहे. पण त्याच्याबद्दल विरोधही वाढत आहे.हे लक्षात घेऊन आता तालिबान सरकारच्या गृहमंत्रालयाने निषेधासंदर्भात नवीन नियम बनवले आहेत, ज्याअंतर्गत कोणत्याही आंदोलनाची माहिती 24 तास अगोदर द्यावी लागेल.

नवीन नियमांनुसार, कोणत्याही निषेधासाठी न्याय मंत्रालयाकडून परवानगी घेतली जाईल.यासह, निषेधाचा उद्देश, घोषणा, ठिकाण, वेळ आणि प्रात्यक्षिकाशी संबंधित प्रत्येक गोष्ट सुरक्षा यंत्रणांना सांगावी लागेल.याशिवाय, सुरक्षा यंत्रणांनाही आंदोलनाची माहिती २४ तास अगोदर द्यावी लागेल.



जर हे केले नाही तर उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.  सोमवारीच तालिबान सरकार स्थापन झाले .तालिबानने सोमवारीच अफगाणिस्तानमध्ये आपले सरकार जाहीर केले आहे.मुल्ला मोहम्मद हसन अखुंद यांना अफगाणिस्तानचे पंतप्रधान बनवण्यात आले आहे.

तसेच मुल्ला बरादार आणि अब्दुल सलाम हनाफी यांना उपपंतप्रधान बनवण्यात आले आहे.हक्कानी नेटवर्क सुरू करणाऱ्या जलालुद्दीनचा मुलगा सिराजुद्दीन हक्कानीला गृहमंत्री करण्यात आले आहे. त्याचबरोबर आमिर खान मुताक्कीला परराष्ट्र मंत्री आणि मुल्ला याकूबला संरक्षण मंत्री करण्यात आले आहे.

Taliban bans protests  Permission must be obtained before making an announcement

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात