वृत्तसंस्था
काबूल : तालिबानच्या दहशतवाद्यांनी येथील नॉर्वेचा दूतावास ताब्यात घेतला. दूतावासात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांनी कार्यालयातील दारूच्या बाटल्या फोडल्या आणि मुलांची पुस्तकंही फाडली. दुसरीकडे तालिबानने अहमद शाह मसूदच्या मकबऱ्याची तोडफोड केली. यासंदर्भातील छायाचित्र स्थानिक माध्यमांनी प्रकाशित केला आहे. Taliban attack on Norway embassy
नॉर्वेच्या दूतावासात तालिबानचे दहशतवादी बंदूक घेऊन घुसल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तत्पूर्वी हेरत शहरात तेथील गर्व्हनर हाऊसमध्ये असलेल्या दारूच्या बाटल्या तालिबानने फोडल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, काबूलमधील नॉर्वे दूतावासावर तालिबानने ताबा मिळवला. तेथील दारूच्या बाटल्या आणि पुस्तकांची नासधूस केली. हा दूतावास नंतर परत करू असे ते म्हणत आहेत. परंतु अगोदर त्यांना दारूच्या बाटल्या फोडायच्या आहेत आणि मुलांची पुस्तकही नष्ट करायची आहेत. जोपर्यंत संपूर्ण बाटल्या फोडल्या जात नाही, तोपर्यंत आम्ही दुतावासाबाहेर येणार नाही, असे तालिबान म्हणत आहे.’’
दुसरीकडे तालिबानने अहमद शाह मसूदच्या मकबऱ्याची तोडफोड केली. यासंदर्भातील छायाचित्र स्थानिक माध्यमांनी प्रकाशित केला आहे. यात समाधीस्थळाची हानी झालेली असते. अहमद शाह मसूद यांना पंजशीरचा सिंह म्हटले जाते. हे अफगाण मुजाहिदीनच्या मुख्य नेत्यांपैकी एक होते. त्यांनी १९८९ रोजी सोव्हिएत संघाचा पराभव केला होता. त्यानंतर तालिबानने आपली व्याप्ती वाढवली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App