Shinzo Abe : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मित्र आणि त्या पलिकडचे आंतरराष्ट्रीय कणखर व्यक्तिमत्व!!


जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या निधनामुळे भारताने आपला जिवलग मित्र गमावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला सुहृद गमावला आहे. भारत सरकारने सिंधू अबे यांच्या निधनानिमित्त एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा ही जाहीर केला आहे Shinzo Abe: A friend of Prime Minister Narendra Modi and a strong international figure beyond that

शिंजो आबे हे आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची भक्कमपणे पाठराखण करणारे आणि भारताला मदतीसाठी कायम हात पुढे करणारे कणखर नेते म्हणून ओळखले जातील.

शिंजो आबे हे जपानमध्ये नजीकच्या भूतकाळात सर्वाधिक काळ सत्तेवर राहिलेले पंतप्रधान ठरले होते. आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत शिंजो आबे यांनी जपानला आर्थिक आणि परराष्ट्र धोरणामध्ये स्वतंत्र दिशा दिलीच, पण भारताच्या दृष्टीने कणखर भारत मित्र म्हणून त्यांची ओळख अधिक ठळक राहिली. 2006, 2014, 2015, 2018 अशा चार वर्षांमध्ये शिंजो यांनी भारताचे दौरे केले होते. भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही पंतप्रधानांच्या कारकिर्दी शिंजो आबे यांनी जवळून पाहिल्या. 2007 मध्ये भारत, ऑस्ट्रेलिया जपान आणि अमेरिका आंतरराष्ट्रीय स्ट्रॅटेजिक समूह क्वाड स्थापन करण्यात शिंजो आबे यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली क्वाडची पहिली बैठक झाली होती.

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन

भारताबरोबर 2006 ते 2020 अशा 14 वर्षांमध्ये जपानचे संबंध दृढमूल करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला. याच कालावधीत भारतातल्या अनेक प्रकल्पांना जपानने अर्थसाह्य प्राप्त करून दिले. यामध्ये दिल्ली मेट्रोपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा देखील समावेश आहे. या बुलेट ट्रेन च्या भूमिपूजन कार्यक्रमास पंतप्रधान मोदीं बरोबर स्वतः शिंजो आबे यांनी देखील हजेरी लावली होती. पुण्यातील मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पाला देखील जपानचेच अर्थसहाय्य आहे. याचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पुणे दौऱ्यात केले होते. भारतातल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या अर्थसाह्या पलिकडे जाऊन भारत आणि जपान यांच्यातीव आर्थिक, व्यापारी, सामरिक आणि तंत्रज्ञान हस्तांतर विषयक संबंध दृढमूळ करण्यासाठी व्यापक आर्थिक करारही शिंजो आबे यांच्याच पंतप्रधान पदाच्या काळात झाले आहेत.

– आबे – मोदी घनिष्ठ संबंध

शिंजो आबे आणि भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात अतिशय घनिष्ठ मैत्री संबंध आहे. शिंजो आबे यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात मोदींनी जपानला दोनदा भेट दिली. त्यावेळी त्यांच्यातील वैयक्तिक केमिस्ट्री हा जागतिक राजकारणातल्या चर्चेचा मोठा केंद्रबिंदू बनला होता. त्याचबरोबर भारत – अमेरिका – जपान आणि ऑस्ट्रेलिया हा आंतरराष्ट्रीय राजकारणातला चतुष्कोन क्वाडच्या स्थापनेत आणि ही संघटना वृद्धिंगत करण्यात शिंजो आबे यांचा सर्वाधिक मोलाचा वाटा राहिला आहे. क्वाडच्या बैठकांना ते सर्वाधिक वेळा उपस्थित राहिलेले जपानचे पंतप्रधान ठरले आहेत.

– क्वाडला मजबुती

आंतरराष्ट्रीय राजकारणात चीन विरोधात ठाम भूमिका घेऊन जपानसह भारतासारखी आंतरराष्ट्रीय शक्ती जोडून घेऊन क्वाड संघटनेला मजबुती देण्याचे फार महत्त्वाचे काम आबे यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात झाले आहे. याबाबत पंतप्रधान मोदींनी गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.

– आबे – मोदी गंगा आरती

आबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच कारकिर्दीत भारताला दोनदा भेट दिली असून त्यापैकी एकदा ते भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे देखील राहिले आहेत. 2015 मध्ये आपल्या भारत दौऱ्यात शिंजो अभियान आबे यांनी वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले होते. त्याचबरोबर वाराणसीतील गंगा आरती समारंभात देखील ते सहभागी झाले होते. त्याचबरोबर त्यांनी मोदीं समावेत साबरमतीच्या महात्मा गांधी आश्रमालाही भेट दिली होती.

– मोदींच्या जपान दौऱ्यात भेट

पंतप्रधान मोदींच्या नुकत्याच झालेल्या जपान दौऱ्यात शिंजो आबे यांनी त्यांना स्वतःच्या खाजगी निवासस्थानी खास निमंत्रण देऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. आपल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे आबे यांनी 2020 मध्ये जपानचे पंतप्रधान पद सोडले. मात्र त्यांची सत्ताधारी नॅशनल डेमोक्रॅटिक पार्टी जपानमध्ये सत्तेवर आहे आणि फुमोदू किशिदा हे त्यांच्या पक्षाचे पंतप्रधान आहेत.

Shinzo Abe: A friend of Prime Minister Narendra Modi and a strong international figure beyond that

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था