रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना मोठी किंमत मोजावी लागेल, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचा इशारा


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन : रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनविरुद्ध पूर्वनियोजित आणि विनाकारण युद्ध छेडल्याचा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी केला आहे. एका परराष्ट्रावर आक्रमण केल्याबद्दल पुतिन यांच्यासारख्या हुकूमशहांना मोठी किंमत मोजावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला.Russian President Putin will have to pay a heavy price, US President Joe Biden has warned

युक्रेनमधील संघर्ष दिवसेंदिवस भीषण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बायडेन यांनी रशियाच्या आक्रमणाला एकत्रित विरोध करण्याचे आवाहन केले. युक्रेन हा जगातील लोकशाही आणि हुकूमशाही यांच्या जागतिक युद्धात अग्रभागी असून लोकशाहीचाच विजय होईल, असेही ते म्हणाले.



हुकूमशहांनी केलेल्या आक्रमणासाठी त्यांना किंमत मोजण्याची वेळ आली नाही, तर ते अधिक अराजक माजवतात असा इतिहास आहे. ते पुढे जात राहतात आणि अमेरिकेसह जगाला असलेला धोका आणि मोजावी लागणारी किंमत वाढत राहते.

यामुळेच दुसºया जागतिक महायुद्धानंतर युरोपमध्ये शांतता व स्थैर्य राखण्यासाठी नाटो आघाडी तयार करण्यात आली. इतर २९ देशांसह अमेरिका याचा सदस्य आहे. त्याचे महत्त्व आहे. अमेरिकेच्या मुत्सद्देगिरीचे महत्त्व आहे, अशा शब्दांत बायडेन यांनी पुतिन यांच्यावर टीका केली.

रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून अमेरिका रशियन विमानांना आपल्या हवाई क्षेत्रात उड्डाण करण्यावर बंदी घालणार आहे. न्यूयॉर्क, वॉिशग्टन, मियामी व लॉस एंजल्स या शहरांसाठी असलेली विमानसेवा आपण स्थगित केल्याचे एअरोफ्लोत या सर्वात मोठय़ा रशियन विमान कंपनीने सांगितले.

Russian President Putin will have to pay a heavy price, US President Joe Biden has warned

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात